माखजन बाजारपेठ पाण्याखाली; रत्नागिरीत एनडीआरएफचे पथक दाखल

water logged in makhjan market
water logged in makhjan market

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापाेली, चिपळुणसह संगमेश्‍वर तालुक्‍यात पावसामुळे सखल भागात पाणी साचले हाेते. गेल्या १६ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील गड नदीस पूर आला आहे. या पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत शिरल्याने व्यावसायिकांचे नुकासन झाले आहे. घुसले आहे.

गड नदीला पूर आल्याने या नजीकच्या माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. आज दिवसभर गुडखा भर पावसाचे पाणी काढण्यातच दुकानदारांचा वेळ गेला. ग्राहक वर्ग देखील पूराच्या पाण्यामुळे बाजारपेठेत येऊ शकलेला नाही.

गणेशाेत्सवाच्या पार्श्वभुमीवर येथील व्यावसायिकांनी आपआपली दुकाने गणेश पूजनासह सजावटींच्या साहित्याने सजवली आहेत. या दुकानांमध्ये पूराचे पाणी घुसल्याने व्यावसायिकांच्या उत्सव काळातील आनंदावर आत्तापासूनच विरजण पडले आहे.

दरम्यान ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी दुकानांमधले साहित्य हलविण्यासाठी प्रशासनातील काेणीही आले नाही असे सांगितले. पावसाळ्यात सातत्याने पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत शिरत असल्याने दुकानदार त्रस्त झाले आहेत. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरफचे पथक दाखल झाले असून सुरक्षिततेच्या उपाययाेजना राबविल्या जातील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com