काेयना धरणातून साेडले पाणी; सांगलीकरांना सतर्कतेचा इशारा

काेयना धरणातून साेडले पाणी; सांगलीकरांना सतर्कतेचा इशारा
koyna dam

सातारा/सांगली : सातारा जिल्ह्यातील काेयना पाणलाेट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातऴीत वाढ झालेली आहे. धरण क्षेत्रातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता काेयना धरणाचे koyna dam सहा वक्र दरवाजे चार फुटांनी उघडले. सध्या काेयना नदी पात्रात एकूण 38 हजार 631 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.

koyna dam
परळीत भाजप पक्षाला रामराम ठोकत 200 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनूसार आज सकाळी आठ वाजता धरणाची पाणी पातळी 2162 फूट 11 इंच झाली हाेती. धरणांत 104.49 TMC पाणीसाठा झाला हाेता. पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असलेने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी अकरा वाजता सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 40 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडणेत येणार हाेता. त्याची कार्यवाही नुकतीच करण्यात आली आहे. काेयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटांनी उघडण्यात आले आहेत. काेयना नदी पात्रात एकूण 38 हजार 631 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

दरम्यान आज (साेमवार) काेयना धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने उद्या (मंगळवार) सांगली येथील कृष्णा नदीची पाणी पातळी 27 फुटापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान सांगलीच्या वारणा धरणातून पाच हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com