उजनी धरणातून भीमा नदी पात्रात चाळीस हजार क्युसेक पाणी सोडले...

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
उजनी धरणातून भीमा नदी पात्रात चाळीस हजार क्युसेक पाणी सोडले...
उजनी धरणातून भीमा नदी पात्रात चाळीस हजार क्युसेक पाणी सोडले...भारत नागणे

पंढरपूर - पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणाऱ्या पाण्यात वाढ सुरूच आहे. धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे सध्या उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. रात्री अकरा वाजता धरणातून भीमा नदी पात्रात चाळीस हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. भीमा नदीकाठच्या लोकांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हे देखील पहा -

मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. पावसाचे पाणी धरण्यात आल्याने धरण 110 टक्के भरले आहे. धरणातून कालपासून भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रात्री अकरा वाजता धरणातून 40 हजार इतका विसर्ग सुरू करण्यात आल्याने भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दोन्ही कालव्याद्वारे 1 हजार. तर सीना माढा बोगद्यातून 148 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

उजनी धरणातून भीमा नदी पात्रात चाळीस हजार क्युसेक पाणी सोडले...
Nashik : बळजबरीने लॉज वर नेऊन तरुणीवर अत्याचार! पहा Video

दरम्यान, आज दुपारी पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांनी नदी पात्रात जाऊ नये असे आवाहन पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com