Satara News : सातारकरांनाे ! 'या' दिवशी तुमच्या पेठेतील पाणीपुरवठा राहणार बंद; जाणून घ्या कास, शहापूरचे वेळापत्रक
Satara News : आगामी काळात सातारकरांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी पालिकेने आठवड्यातून एक दिवस कास आणि शहापूर पाणीपूरवठ्यात कपात (satara water cut news) करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन सातारा पालिका प्रशासनाने घेतला आहे. (Maharashtra News)
सातारा पालिकेने पाणीकपातीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आजपासून (गुरुवार) त्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला. त्यानूसार प्रत्येक पेठेतील पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार आहे.
असे आहे वेळापत्रक
कास योजनेतील पाणीपूरवठा राहणार या दिवशी बंद
सोमवार शुक्रवार पेठ, गडकर आळी, शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ, बुधवार नाका, नामदेववाडी.
बुधवार मनामती चौक, गुजर आळी, चिमणपुरा, ढोणे कॉलनी.
गुरुवार भटजी महाराज मठ, रामाचा गोट, गवंडी आळी, मंगळवार तळे, कोल्हटकर आळी, नागाचा पार.
शुक्रवार संत कबीर सोसायटी, पोळ वस्ती, पापाभाई पत्रेवाला चाळ, चिमणपुरा, गारेचा गणपती, मनामती चौक, पद्मावती मंदिर, होलार समाज मंदिर, ठक्कर कॉलनी, बोगदा, समर्थ मंदिर परिसर, धस कॉलनी, दस्तगीर कॉलनी.
शनिवार व्यंकटपुरा, धनिणीची बाग, कारंडबी नाका, पोळ वस्ती, पॉवर हाउस.
रविवार अदालत वाडा, माची पेठ, बोगदा परिसर, बालाजीनगर, कांबळे वस्ती, जांभळेवाडा, जंगीवाडा, गोल मारुती परिसर.
शहापूर योजनेतील पाणीपूरवठा राहणार या दिवशी बंद
सोमवार तांदुळ आळी, मोती चौक, देवी चौक, लक्ष्मी हॉटेल, गोरक्षण बोळ, शनि मारुती मंदिरचा मागील भाग, मोती चौक ते ५०१ पाटी परिसर, औंधकर मळा, मोती चौक, राधिका टॉकीज परिसर.
मंगळवार समर्थ मंदिर चौक ते हत्तीखाना, सोमवरा पेठ, बागवान गल्ली, दैवज्ञ मंगल कार्यालय, न्यू इंग्लिश स्कुल चौक, जानकीबाई झंवर शाळा परिसर, खडेश्वर शाळा, कुपर कारखाना,पिसाळ आर्केड, शाहू गार्डनची मागील बाजू, घोरपडे कॉलनी, केसरकर पेठ, जुना दवाखाना येथील काही भाग, शिर्के शाळा, कमानी हौदाची मागील बाजू व इतर भाग.
बुधवार कुंभारवाडा, कोल्हाटी वस्ती, चारभिंत टाकी ते कुपर कारखाना परिसर.
गुरुवार राजलक्ष्मी टॉकीजची मागील बाजू, शेटे चौक, नालबंद वाडा, खड्डा मशीद, कोतवाल वाडा, औंधकर घर, राजसपुरा,दुर्गा पेठ.
शुक्रवार टोपे मामा दत्त मंदिर, घोरपडे कॉलनी, काकडे बोळ, जुना दवाखाना परिसर, शनिवार- मल्हार पेठ, बडेकर वस्ती, नकाशपुरा, शनिवार पेठ, भवानी शाळा, रविवार पेठ, लोणार गल्ली,पंताचा गोट, खंडोबाचा माळ.
रविवार समर्थ मंदिर परिसर, विश्वेश्वर मंदिर परिसर, स्टेट बँक कॉलनी, मंगळवार पेठ, करंजे, शेंडे कॉलनी, निसर्ग, एकता कॉलनी, बुधवार नाका.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.