कोयना धरण व्यवस्थापनाचा नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरण व्यवस्थापनाचा नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा
koyna dam

सातारा : काेयना धरणाची koyna dam पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज (रविवार) दुपारी दाेन वाजता धरणाचे वक्रदरवाजे एक फुटाने उचलण्यात येणार असून दहा हजार क्यूसेक पाणी काेयना नदी पात्रात साेडण्यात येणार आहे अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.

धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनूसार आज (रविवार) सकाळी आठ वाजता धरणाची पाणी पातळी २१६१ फूट ११ इंच इतकी झाली आहे. सध्या धरणात १०३.१९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामुळे धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक अपेक्षित आहे.

koyna dam
सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करुया; बाळासाहेब पाटलांचे गणेशभक्तांना आवाहन

त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज (रविवार) दुपारी दाेनला धरणाची वक्रदरवाजे १ फुट उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडणार आहाेत. याबराेबरच धरणांत आवक वाढल्यास या विसर्गात वाढ होणार असल्याने कोयना नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com