पारदर्शकता व गतिमान प्रशासनावर भर - जिल्हाधिकारी पवनीत कौर

अमरावतीच्या नव्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आपल्या पदाचा कार्यभार यापूर्वीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आज स्वीकारला आहे.
पारदर्शकता व गतिमान प्रशासनावर भर - जिल्हाधिकारी पवनीत कौर
पारदर्शकता व गतिमान प्रशासनावर भर - जिल्हाधिकारी पवनीत कौरअरुण जोशी

अमरावतीच्या नव्या जिल्हाधिकारी पवनीत कौर Newly appointed District Collector of marvati district Pavneet Kaur यांनी आपल्या पदाचा कार्यभार यापूर्वीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आज स्वीकारला आहे. जिल्ह्यातील पुनर्वसन, कुपोषण आदी समस्या सोडविण्यासाठी योजनांना गती देतानाच पारदर्शकता व गतिमान प्रशासनावर भर देऊ, असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे सांगितले. we will focuse on transparency and speedy government Newly appointed District Collector Pavneet Kaur said

हे दखील पहा -

सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. तथापि, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात येतील. विशेषकरून, लसीच्या पुरवठ्याअभावी लसीकरण मोहिमेत खंड पडू नये यासाठी दक्षतापूर्वक नियोजन करण्यात येत आहे. 45 वर्षांवरील व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात पांदणरस्ते योजनेच्या अंमलबजावणीला पूर्व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गती दिली. हा कार्यक्रम यापुढेही भरीवपणे राबविणार असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com