स्थानिकांना नोकरी डावलणाऱ्यांना वठणीवर आणू - उद्योगमंत्री सुभाष देसाई

कोरोना काळात राज्य सरकारने 60 कंपन्यांबरोबर औद्योगिक करार केले. त्यामुळे स्थानिक तरुणांना नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली.
स्थानिकांना नोकरी डावलणाऱ्यांना वठणीवर आणू - उद्योगमंत्री सुभाष देसाई
स्थानिकांना नोकरी डावलणाऱ्यांना वठणीवर आणू - उद्योगमंत्री सुभाष देसाईराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र येऊ घातले आहे. असे असताना ज्या उद्योजक कंपन्या मराठी तरुणांना नोकरीत सामावून घेत नाही. त्यांना शिवसेना वठणीवर आणेल अशी तंबीच कंपन्यांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. कोरोना काळात इतर राज्य कारणं देत बसली असताना महाराष्ट्र राज्याने 60 कंपन्यांबरोबर औद्योगिक करार केले आहेत. विशेष म्हणजे या कंपन्या कोकणात रायगडात येत आहेत. त्यामुळे स्थानिक तरुणांना नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

हे देखील पहा -

आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने पेण येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. उद्योगमंत्री सुभाष देसाई या मेळाव्याला उपस्थित होते. त्यावेळी आपल्या भाषणातून स्थानिकांच्या नोकऱ्यांच्या प्रश्न, निवडणूक, कोकणात येत असलेल्या औद्योगिक क्षेत्राबाबत आपली भूमिका भाषणातून स्पष्ट केली. आमदार महेंद्र दळवी, संपर्क प्रमुख विलास चावरी, सह संपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, बबन पाटील पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com