अमरावतीत शस्त्रसाठा जप्त! दोन आरोपी अटकेत

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मध्ये स्थानिक पोलिसांकडून शहरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अमरावतीत शस्त्रसाठा जप्त! दोन आरोपी अटकेत
अमरावतीत शस्त्रसाठा जप्त! दोन आरोपी अटकेत अरुण जोशी

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मध्ये स्थानिक पोलिसांकडून शहरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून आणखी शस्त्रसाठा व यामध्ये आणखी आरोपी सापडू शकतात का ? याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती ठाणेदार दीपक वानखडे यांनी दिली आहे.

हे देखील पहा :

अंजनगाव सुर्जी शहरातील अजीजपुरा येथे पोलीसांना काही युवक शस्त्र तयार करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अजीजपुरा येथील एका घरावर धाड टाकली असता दोन तलवारी, दोन फडशा, एक जाम्बिया, दोन धारदार लोखंडी पाईप, एक फाइटर चेन फडशा व यांना धार लावण्यासाठी इलेक्ट्रिक मशीन सापडली आहे.

अमरावतीत शस्त्रसाठा जप्त! दोन आरोपी अटकेत
कौटुंबिक वादातून पती-पत्नीचा धारदार शस्त्रांनी खून!

यामध्ये दोन आरोपी जुबेर खा वल्द अनवर खा (२६) व महम्मद तल्हा महमंद रफिक (२३) दोन्ही राहणार अजीजपुरा, अंजनगाव सुर्जी या आरोपींना अटक करण्यात आली आहे.सध्या अमरावती शहरात संचारबंदी सुरू आहे आणि या संचारबंदी मध्ये हे युवक हे शस्त्र कश्यासाठी तयार करीत होते ते कुठे घेऊन जाणार होते याचा तपास आता पोलीस करीत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com