Weather Forecast : राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट अधिक तीव्र? जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, शनिवार-रविवारी या दोन दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज पाहता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Weather Forecast : राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट अधिक तीव्र? जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Heat WaveSaam Tv

Maharashtra Weather: यंदाच्या उन्हाळ्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एप्रिल महिन्यात रेकॉर्ड तोडले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, शनिवार-रविवारी या दोन दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) अंदाज पाहता ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, २ मेपासून मुंबईसह (Mumbai) अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि हलका पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.

Heat Wave
पाणी डोक्यावरून जात असेल तर त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावे लागेल- राऊत (पाहा Video)

महाराष्ट्रात जिल्ह्यात सर्वात जास्त तापमान;

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये (Chandrapur) सर्वाधिक उष्णता होती. यावेळी तेथील कमाल तापमान ४६.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. तर दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार बहुतांश शहरांमध्ये समाधानकारक ते मध्यम श्रेणीत उष्मा नोंदवला गेला आहे.

शनिवारी मुंबईत कमाल तापमान ३७ आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर पुण्यात कमाल तापमान ४० आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. नागपुरात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर, नाशिकमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. औरंगाबादमध्ये कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com