Unseasonal Rain: शेतकऱ्यांची चिंता वाढली; विदर्भात येत्या १४ ते १७ मार्चदरम्यान वादळी पावसाचा अंदाज

कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तो मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे.
Weather News
Weather Newssaam tv

नागपूर : राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट अद्याप संपलेलं नाही. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावला आहे. आता विदर्भावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट दिसून येत आहे.

येत्या १४ मार्चनंतर विदर्भात जोरदार पाऊस आणि गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे. (Latest News)

Weather News
CM vs Ajit Pawar: अवकाळी पावसानं शेतकऱ्याला रडवले; विधानसभेत सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर बरसले

कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तो मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. येत्या १४ ते १७ मार्चदरम्यान वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. गहू, हरभरा पिकाची कापणी तातडीने करावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भात कमाल तापमान 38 ते 39 राहण्याचा अंदाज आहे. संत्रा पिकाची वाढीव तापमानापासून बचावासाठी उपाययोजना करा, असं हवामान विभागने सांगितलं आहे.

Weather News
Brinjle Price: बळीराजाची पुन्हा थट्टा! कोल्हापुरात वांग्याला प्रति किलो 27 पैसे दर

नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा

नाशिक जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे. जवळपास ४ हजार हेक्टर क्षेत्राला या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यामुळे ५ हजार शेतकरी अडचणीत सापडले आहे.

प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या अवकाळी आणि गारपीटीने ४ हजार १५४ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. सर्वाधिक फटका निफाड तालुक्याला बसला असून येथे २४१९ हेक्टरवरील गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com