रोहित पवारांच्या ध्वजरथाचे संगमनेरात जोरदार स्वागत
स्वराज्य ध्वज रथाचे पेमगिरी किल्ल्यावर स्वागत.

रोहित पवारांच्या ध्वजरथाचे संगमनेरात जोरदार स्वागत

अहमदनगर ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वराज्य ध्वज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी या ध्वजरथाचे जोरदार स्वागत केले.

कर्जतमधील संत गोदड महाराजांच्या मंदिरातून गुरुवारी (ता. 09) रोजी आमदार रोहीत पवार यांच्या हस्ते या ध्वजयात्रेस प्रारंभ झाला होता. तेथून जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, लेण्याद्री व विघ्नेश्वराच्या दर्शनानंतर आज दुपारी या ध्वजरथाने संगमनेर तालुक्यातील पेमगिरीच्या गडावर प्रवेश केला. Welcome to Rohit Pawar's flag at Pemgiri fort

स्वराज्य ध्वज रथाचे पेमगिरी किल्ल्यावर स्वागत.
डाळिंबाचे हेक्टरमध्ये ४२ टनांचे उत्पादन

शहाजी महाराज आणि जिजामाता यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या या किल्ल्यावरील पेमाईमातेचे दर्शन घेण्यात आले. स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांनी ध्वजरथाचे पूजन केले. सर्व जातीधर्माचे प्रतिनिधीत्व करणारा 74 मीटर जगातील सर्वाधिक उंचीचा भगवा ध्वज व हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोचवण्यासाठी ही यात्रा पुढील 37 दिवस चालणार आहे.

महाराष्ट्रासह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे, धार्मिक पीठांमध्ये 74 ठिकाणी या सर्वसमावेशक ध्वजाचे प्रातिनिधीक पूजन करावे, ही या प्रवासामागील भावना आहे. त्यासाठी 6 राज्यांतून 12 हजार किलोमीटर प्रवास होणार आहे.

पेमगिरी येथे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कपील पवार, मिलिंद कानवडे, सुरेश गडाख, राहुल वर्पे, अमोल राऊत, अक्षय भालेराव, प्रदीप शेटे, राहुल राऊत, संकेत कोल्हे, मनीष माळवे, अशोक कानवडे, अर्चना वनपत्रे, रावसाहेब डूबे, सरपंच द्वारका डूबे, सोमनाथ गोडसे आदींच्या उपस्थितीत स्वराज्य ध्वजाचे पूजन करण्यात आले.Welcome to Rohit Pawar's flag at Pemgiri fort

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com