11 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित काय करता; सर्वांनाच करा!

एसटी कर्मचाऱ्यांनी दिला सरकारला इशारा; दिग्रस आगारात निलंबित कर्मचाऱ्यांचा सत्कार
11 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित काय करता; सर्वांनाच करा!
11 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित काय करता; सर्वांनाच करा!संजय राठोड

-- संजय राठोड

यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या विलीनीकरणाचा लढा आता अधिक तीव्र झाला आहे. तीन दिवसात जिल्ह्यातील 158 कर्मचाऱ्यांचा निलंबित करण्यात आले आहे. दिग्रस आगारातील संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांची माजी मंत्री, आमदार संजय राठोड यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी राठोडांनी म्हटले की, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत.

हे देखील पहा :

मुख्यमंत्री तुमच्या वर अन्याय होऊ देणार नाहीत असे सांगत राठोड यांनी कर्मचाऱ्यांना धीर दिला. दिग्रस आगारातील कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी लढा देत आहेत. परंतू हा लढा थांबवावा असे म्हणत गुरुवारी, दि.11 नोव्हेंबरला मध्यवर्ती कार्यालयाने लढ्यातील ११ कर्मचारी निलंबित केले. याची खंत नाही, तर अभिमान आहे. असे म्हणत 11 निलंबित आंदोलक एस.टी कर्मचाऱ्यांचा पुष्पहार घालून सन्मान केला.

11 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित काय करता; सर्वांनाच करा!
Nagpur : गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून क्यू-आर कोड प्रणाली विकसित!
11 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित काय करता; सर्वांनाच करा!
"अंघोळ केल्यावर पाप धुवून जाईल" म्हणत 18 वर्षाच्या मुलीवर मौलवीकडून बलात्कार!

या अकरा जणांनाच का? तर संपात सहभागी सर्व 202 कर्मचाऱ्यांना निलंबित केले तरी चालेल. परंतु हा लढा याही पेक्षा अधिक तीव्र करु अशी भुमीका आंदोलकांनी घेतली आहे. या संपात दिग्रस आगाराचे 212 पैकी 92 चालक, 70-वाहक, 12 प्रशासकीय कर्मचारी व 29 यांत्रिक असे एकूण 202 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. आंदोल कर्ते एस.टी. कर्मचाऱ्यांचा विषय हा मध्यवर्ती कार्यालयाचा आधीन असल्याने, त्यांनी आंदोलन थांबविण्याचे पत्र दिले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com