सोलापूर जिल्ह्यात आढळला पांढऱ्या रंगाचा खोकड!

वन्यजीव अभ्यासकांच्या मते ही भारतातील पहिलीच नोंद आहे.
Indian Fox
Indian FoxSaam Tv

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यात पांढऱ्या रंगाचा खोकड आढळला आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या मते ही भारतातील पहिलीच नोंद आहे. सोलापूर जिल्ह्यात विविध वन्यप्राणी आढळतात. यामध्ये लांडगा, कोल्हा तसेच खोकड अशा प्राण्यांचा वावर आहे. अक्कलकोट तालुक्यातील माळरानावर अतिशय दुर्मिळ लुसिस्टिक खोकड पहिल्यांदाच आढळला आहे, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांनी दिली. (white colored indian fox found in solapur)

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे. याला इंडियन फॉक्स या नावाने सुद्धा ओळखला जाते. खोकड हा राखाडी तांबूस रंगाचा प्राणी आहे, परंतु यावर्षी निरीक्षण करत असताना पांढऱ्या रंगाचा खोकड दिसून आला. ल्युसिस्टिक असलेला हा खोकड संपूर्णतः पांढरा असून शेपटीच्या टोकास काळा रंग आहे असे दिसून आले. यापूर्वी ल्युसिस्टिक रानमांजर आणि कोल्ह्याची नोंद झाली होती, पण पांढऱ्या खोकडची ही भारतातील पहिलीच नोंद आहे.

हे देखील पाहा

खोकडाच्या पांढऱ्या रंगाच्या दिसण्याचे कारण म्हणजे अनुवांशिक उत्परीवर्तन/दोष आहे. यामध्ये अनेक रंगांच्या रंगद्रव्यांच्या आंशिक किंवा संपूर्ण अभाव असतो. ल्युसिस्टिक खोकड हे पूर्णपणे पांढरे असून पाय, चेहऱ्यावर किंवा पाठीवर गडद खुणा दिसून येतात. खोकड हा प्रामुख्याने माळरानात, शेतात, खुरट्या झुडुपांच्या प्रदेशात आढळतो.

आकाराने खोकड हा कोल्ह्यापेक्षा लहान असून लांबी ५० ते ६० सेमी इतकी असते, शरीराचा रंग राखाडी तांबूस असतो. दिसायला सडपातळ आणि लांब झुपकेदार शेपटीमुळे खोकड सहज ओळखता येतो. खोकड हे जमिनीत, बांधावर किंवा लहानशा टेकडावर बिळ करून राहतात. सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी, कीटक, बोर आणि पक्षी हे त्यांचे मुख्य खाद्य होय तसेच उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवत असल्यामुळे खोकड हा शेतकऱ्यांना हितकारक आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com