पंकजा मुंडे यांच्या मनातले 'कौरव' नक्की कोण?

प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने अनेक मुंडे समर्थक कार्यकर्ते नाराज होते
पंकजा मुंडे यांच्या मनातले 'कौरव' नक्की कोण?
पंकजा मुंडे यांच्या मनातले 'कौरव' नक्की कोण? saam tv

मुंबई : पाच पांडवांनी महायुद्ध (mahayudha) जिंकले, कारण शंभर कौरवांचे (Kaurav) सारथी मनाने त्यांच्यासोबत नव्हते. आता मला एकटीला न्याय नको, मला तुमच्यासकट न्याय हवा आहे. त्यामुळे जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत हे धर्मयुद्ध (Dharmyudha) टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे, असे म्हणत पंकजा मुंडे (Pankja munde) यांनी आपल्या नाराज कार्यकर्त्यांची समजूत घातली. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे (Pritam munde) मुंबईत असल्याचे कळताच अनेक नाराज मुंडे समर्थक मुंबईत येऊन धडकले होते. त्या सर्वांची नाराजी यावेळी त्यांनी दूर केली. इतकेच नव्हे तर जेव्हा इथे राम नाही असे वाटेल त्यादिवशी पुढे बघू, असे सूचक वक्तव्यही केलं. मात्र आता पंकजा मुंडे यांच्या मनातले कौरव नक्की कोण, असा प्रश्न आता उपथित होत आहे. (Who exactly is the 'Kaurav' in Pankaja Munde's mind?)

पंकजा मुंडे यांच्या मनातले 'कौरव' नक्की कोण?
व्यापाऱ्यांचे हातात बोर्ड घेऊन प्रशासनाच्या विरोधात आंदोलन

प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने अनेक मुंडे समर्थक कार्यकर्ते नाराज होते. या नाराजीतून राज्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. या सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे आज भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी नामंजूर केले. मुंबईत आयोजित एका सभेत त्यांनी या कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत असल्याचे सांगितले. 'मी जमिनीवर डोकं टेकवूनही तुमचे ऋण फेडू शकणार नाही. मुंडे साहेबांनी तलागाळातील लोकांसाठी काम केलं. त्यांच्या समाजातील वंचित लोकांना मंच स्थापन करून दिला. गोपीनाथ मुंडे साहेबांवर तुमचे प्रेम आहे. मुंडे साहेबांनी मला राजकारणात तुमच्यासाठी आणलं. मला किंवा माझ्या बहिणीला मंत्री बनवण्यासाठी नाही. यासाठी आम्ही राजकारणात आलो नाही. राज्यातील काना कोपऱ्यातील मुंडे साहेबांचा कार्यकर्ता माझे कुटुंब आहे. लोकांची काम करण्यासाठी मी राजकरणात आले. मंत्रिपदाची मागणी हे मुंडे साहेबांचे संस्कार नाही. मी लालची नाही. मला, माझ्या बहिणीला मंत्रिपद, खुर्ची नको. असे म्हणत यावेळी पंकजा मुंडे यांनी आपण सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर करत असल्याची घोषणा केली.

'' मुंडे साहेबांनी हाडाची काडं केली, त्यांनी त्याग केला. मोठा नेता नेहमी त्याग करतो. माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून तुम्ही राजीनामे दिले. आता तुमच्या डोळ्यातलं पाणी पाहून मी कशी जगू, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेच माझे मंत्री आहेत. मला पक्षाने जे दिलं ते मी लक्षात ठेवेल, पक्षाने जे दिल नाही ते कार्यकर्ते लक्षात ठेवतात. जे घर आपण तयार केलं ते आपणच का मोडायचं, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मात्र दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या बैठकीत मला कोणीही बोललं नाही. पंतप्रधानांसोबत झालेली बैठक संघटनेसाठी होती. तिथे आम्हाला सन्मानाची वागणूक दिली गेली. तसेच त्यांनी आम्ही, कार्यकर्त्यांची नाराजी दूर करू, असा विश्वासही यावेळी पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला. त्यामुळे आता आपण आपलं घर सोडायच नाही. माझे कार्यकरते हीच माझी शक्ति आहे. असे म्हणत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिले. त्याचबरोबर, आपण सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याहे ही त्यांनी यावेळी सांगितले.

Edited By -Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com