नांदेड हिंसाचाराचा कट बऱ्याच दिवसांपासून शिजत होता?; यात कोणाचा हात?

१२ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी नांदेडात रझा अकादमीसह १२ ते १५ मुस्लिम संघटनांनी बंदचं आवाहन केलं होतं.
नांदेड हिंसाचाराचा कट बऱ्याच दिवसांपासून शिजत होता?
नांदेड हिंसाचाराचा कट बऱ्याच दिवसांपासून शिजत होता? - Saam Tv

नांदेडमध्ये अचानक उसळलेल्या हिंसाचाराचा कट बऱ्याच दिवसांपासून शिजत होता का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी अशा घटनेची पेरणी केली गेली होती, का याचाही आता तपास सुरू आहे. रझा अकादमीकडून बंदची हाक, मोर्चा त्यानंतर हिंसाचार आणि पुन्हा प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून लगेच आंदोलनाची हाक, ही आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलीय.

१२ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी नांदेडात रझा अकादमीसह १२ ते १५ मुस्लिम संघटनांनी बंदचं आवाहन केलं होतं. शहरातील मुस्लिमबहुल भागात सकाळी कडकडीत बंद होते. त्याच काळात देगलूर नाका येथे मुस्लिमांनी निषेध सभा घेतली. त्याठिकाणी भाषणे झाली. दुपारनंतर निषेध सभेसाठी जमलेल्या जमावाने देगलूर नाका, शिवाजीनगर, कलामंदिर, पावडेवाडी नाक्यासह अनेक ठिकाणी दगडफेक केली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहने, दुकान, वाईनमार्ट, स्वीटमार्ट काही दुकानांची तोडफोड करीत दहशत निर्माण केली.

नांदेड हिंसाचाराचा कट बऱ्याच दिवसांपासून शिजत होता?
MPSC च्या 416 जागांच्या नियुक्त्या तातडीने होणार, आज बैठक; पाहा Video

नांदेडात रझा अकादमीकडून बंदची हाक दिल्यानंतर मोठा जमाव रस्त्यावर उतरला होता. मात्र, पोलिसही अनभिज्ञ असल्यासारखी स्थिती होती. इतक्या मोठ्या संख्येने अचानक जमलेल्या जमवासमोर मोजक्या पोलिसांचा बंदोबस्त होता. ज्यावेळी तोडफोड आणि जाळपोळ झाली, त्यावेळी पोलीस पोहचले. रझा अकादमीच्या या बंदच्या आवाहनाला मुस्लिम समाजातील जवळपास १२ ते १५ संघटनांनी पाठिंबा दिला होता. नांदेडातल्या भागात मोठ्या संख्येने मुस्लिम लोक जमले होते. त्यामुळे या बंद, सभा आणि तोडफोडीचा कट अगोदरच शिजला होता, असा अंदाज आहे. कारण अत्यंत व्यवस्थितपणे सोशल मीडियाचा वापर करून इतकी गर्दी जमवल्याचं हळूहळू समोर येतंय.

नांदेड हिंसाचाराचा कट बऱ्याच दिवसांपासून शिजत होता?
सरकार आरोग्य विभागाच्या भरतीचा निकाल लावण्याच्या तयारीत- दत्ता भरणे (पहा Video)

याप्रकरणी चारशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ५० आरोपींना अटक केली. यातील १० जण गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले लोक आहेत. रजा अकादमीच्या आयोजकावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. व्यासपीठावरुन प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई केली जाणार आहे. हे इतकं झाल्यानंतर लगेच भाजपकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली. त्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी भाजपकडून आंदोलन करण्याबाबत परवानगी मागण्यात आली. मात्र, पोलिसांनी नाकारले. कोणतीही कल्पना नसताना अचानक उसळलेल्या हिंसाचारामुळं आणि लगेच भाजपने आंदोलनासाठी हालचाली सुरू केल्याने रझा अकादमी आणि भाजपनेच षडयंत्र घडवून आणले का? याचीही आता चौकशी होण्याची शक्यता आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतांची जुळणी करण्यासाठी आतापासूनच हालचाली सुरू झाल्यात का यावर चर्चा सुरू झाली आहे. मुस्लिम संघटना आणि राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची भूमिका संशयास्पद दिसू लागली आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अधिक यश मिळेल म्हणून असा प्रयत्न केला जातोय का, याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यात हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजात तेढ निर्माण करून कोणीतरी आपली पोळी भाजेल अशी भीती राज्यातील जनतेला वाटू लागली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com