बीड पोलीस कुंडलिक खांडेवर मेहरबान का?

सामान्यांना वेगळा न्याय आणि सत्ताधारी पक्षाच्या आरोपीला वेगळा न्याय का?
बीड पोलीस कुंडलिक खांडेवर मेहरबान का?
बीड पोलीस कुंडलिक खांडेवर मेहरबान का?विनोद जिरे

बीड - अवैध गुटखा तस्करी प्रकरणात मुख्य सूत्रधार, शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आज बीड शहरातील शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमात दिसून आला. अवैध गुटखा प्रकरणात केज पोलीसात गुन्हा दाखल आहे. पोलीस रेकॉर्डवर फरार आरोपी म्हणून नोंद आहे मात्र तोच आरोपी थेट शिवसेना सचिव खा. अनिल देसाई यांच्या स्वागताला हजर राहिल्याने बीड पोलीस का अटक करत नाहीत ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच बीड शहरामध्ये चौकाचौकात त्याचे बॅनर देखील लागले आहेत. सामान्यांना वेगळा न्याय आणि सत्ताधारी पक्षाच्या आरोपीला वेगळा न्याय का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे देखील पहा -

या प्रकरणात कुंडलिक खांडे वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे लवकरच कारवाईचा निर्णय घेतील. त्यांच्यावर आरोप आहेत चौकशी सुरू आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन कारवाई केली जाईल असं शिवसेना सचिव खा.अनिल देसाई यांनी सांगितलं. या प्रकरणात कुंडलिक खांडे यांना विचारले असता मला या प्रकरणात गुंतवले जात आहे. तसेच कलम 169 नुसार माझे नाव या प्रकरणातून वगळण्यात येणार आहे. तसे पोलिसांनी मला सांगितले आहे. कार्यकर्त्याचा फोन आला म्हणून, मी त्या ठिकाणी गेलो होतो, यात माझा कसलाही संबंध नाही. मला गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा कुंडलिक खांडे यांनी सांगितलं. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात सत्य बाहेर येईलअसं देखील ते म्हणाले.

बीड पोलीस कुंडलिक खांडेवर मेहरबान का?
निवडणुकीला फटका बसणार म्हणून मोदींनी हे कायदे रद्द केले – शरद पवार

बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक कुमावत यांनी नांदूरघाट,इमारपूर आणि बीड मध्ये गुटख्याच्या गोदामावर छापे घातले. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हेच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हाप्रमुख खांडे फरार असल्याचं पोलीस रेकॉर्डवर आहे. मात्र फरार खांडे शिवसेनेचे सचिव खा अनिल देसाई हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते .त्यावेळी जिल्हाप्रमुख म्हणून फरार असलेले कुंडलिक खांडे यांनी देसाई यांच्या स्वागतासाठी हजर असल्याचे दिसून आले.

एवढंच नव्हे तर जाहीर कार्यक्रमात पोलिसांच्या हजेरीत फरार आरोपी खांडे हजर होते. यामुळे बीड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून सत्ताधारी पक्षाचा आरोपी असल्यामुळे त्याला अटक केली जात नाही का ? असा प्रश्न सामान्य सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे. तसेच आरोपी असताना जाहीर कार्यक्रमात मिरवणारे कुंडलिक खांडे यांना कायद्याचा धाक उरला नाही का? अनिल भाऊ देसाई बीड शहरामध्ये आले असता त्यांच्या स्वागतासाठी बीड शहरातील महत्त्वाच्या जागेवर चौकाचौकात जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे बॅनर होल्डिंग झळकत आहेत त्यामुळे खरंच पोलिसांना आरोपी सापडत नाहीत का ? असा प्रश्न भाई मोहन गुंड यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आशा फरार अन गुटखा तस्कर आरोपीला पाठीशी घालणार की कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com