तुम्ही कधी फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही; भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल

शरद पवारांना (Sharad Pawar) जातीयवादी ठरवण्यासाठीच कालची राज ठाकरे यांची सभा होती की काय?
Chhagan Bhujbal on Raj Thackeray, Chhagan Bhujbal Latest Marathi News
Chhagan Bhujbal on Raj Thackeray, Chhagan Bhujbal Latest Marathi NewsSaam TV

नाशिक : शरद पवारांना (Sharad Pawar) जातीयवादी ठरवण्यासाठीच कालची राज ठाकरे यांची सभा होती की काय? तुम्ही कधी फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही असा सवाल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज ठाकरेंवर केला. (Chhagan Bhujbal on Raj Thackeray)

तसंच लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) समाधी बांधल्याचं जे वक्तव्य केलं ते धादांत खोटं असल्याचंही म्हणाले. ते म्हणाले ज्या वेळी फुलेंनी समाधी शोधली, त्यावेळी टिळक केवळ १३ वर्षांचे होते. टिळकांनी शिवस्मारकासाठी केवळ फंड गोळा केला, मात्र उभ्या आयुष्यात काहीच केलं नाही. पुढे विचारणा झाल्यावर ज्या बँकेत फंड ठेवला होता, ती बँकच बुडाली असं सांगण्यात आलं तसंच फुलेंनी पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात सुरू केली ते ब्राम्हण होते. द्वेष ब्राह्मणांचा द्वेष नाही केला तर ब्राह्मणत्वचा द्वेष केला. टिळक दोन वेळा रायगडावर गेले मात्र त्यांना शिवाजी महाराजांची समाधी मिळाली नाही. टिळकांनी एकदा नानासाहेब पेशवे आणि दुसऱ्यांदा रामदास स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन केले खळबळजनक आरोप देखील भुजबळांनी केला.

काय म्हणाले होते राज ठाकरे -

लोकमान्य टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली. मग त्यांना ब्राह्मण समजणार का?, त्यांनी पहिलं वर्तमानपत्र काढले, त्याचे नाव ठेवले मराठा होते असही राज (Raj Thackeray) यांनी काल च्या औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेत वक्तव्य केलं होतं. तसंच त्यांनी यावेळी शरद पवार जाती-जातींमध्ये भेद करतात, त्यांना हिंदू या शब्दाची अ‍ॅलर्जी आहे. शिवाय पवार पुस्तक वाचताना देखील पुस्तकाचा लेखक कोणत्या जातीचा आहे ते बघतात असा आरोप राज यांनी काल केला होता.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com