पैसे मागितल्याने पत्नीने केली पतीची हत्या; आत्महत्या केल्याचा बनाव

किरकोळ कारणावरून पत्नीने पतीची हत्या केल्याने खळबळ.
Nashik Crime
Nashik CrimeSaam TV

नाशिक: पतीने पाेस्टातील आरडीचे पैसे मागितल्याने पत्नीने पतीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना सिन्नरच्या मुसळगाव शाळेजवळ घडली आहे. हत्येनंतर पत्नीने पतीने आत्महत्या केल्याची बनाव रचल्याचे समाेर आले आहे. सीताराम लक्ष्मण गायकर असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांच्या चौकशी केल्यानंतर सत्य समोर आले आहे. या प्रकरणी संशयित पत्नीला ताब्यात घेतले आहे. सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम यांचे पत्नी वनिता हिच्यासोबत काही ना काही कारणावरुन वाद होत असे.

दोन दिवसांपूर्वी सीताराम आणि वनिता यांच्यात जोरदार भांडण झाले. भिशीचे पैसे भरण्यासाठी पोस्टाचे पैसे द्यावे, अशी मागणी सितारामने केली होती. याचा राग वनिताला अनावर झाला. त्यामुळे तिने संतापाच्या भरात फेट्याच्या कापडाने पती सिताराम याचा गळा आवळला. त्यानंतर ती पाेलिस स्टेशनमध्ये आली आणि तिने पोलिसांना ‘पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. याप्रकरणात पोलिसांना संशय आला. त्यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. अखेर वनिताने पोलिसांकडे खुनाची कबुली दिली. त्यानुसार, पत्नी वनिता विरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com