शिंदे यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांचं निलंबन होऊ शकतं का? कायदा काय सांगतो? वाचा सविस्तर...

शिवसेनेने 17 आमदारांचं पद रद्द करण्याची मागणी केली आहे.
शिंदे यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांचं निलंबन होऊ शकतं का? कायदा काय सांगतो? वाचा सविस्तर...
Eknath ShindeSaam TV

मुंबई: शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना घेऊन बंड केलं आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. अशातच शिवसेनेनं आता हे बंड मोडून काढण्यासाठी कायद्याचा आधार घेतला आहे. शिवसेनेने 17 आमदारांचं पद रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या गटातील 17 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष त्यांना सुनावणीसाठी नोटीस बजावू शकतात, त्यात एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. (Eknath Shinde News)

Eknath Shinde
सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे मुंबईकडे? गुवाहाटीतून विमानतळाच्या दिशेने रवाना

दरम्यान, शिवसेनेनं आता आपला गटनेता देखील बदलला आहे. त्यामुळे खरोखरच या आमदारांचं निलंबन होऊ शकतं का? असा सवाल केला जात आहे. तर, आमदारांचं निलंबन झाल्यास शिंदेही कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. याबाबत कोर्टानेही काही निर्णय दिले आहेत. शिवसेनेनं सुरूवातीला 12 आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर त्यात आणखी पाच आमदारांच्या नावाची भर पडली आहे.

विधिमंडळ गट म्हणजे काय?

जर एखादा पक्ष कोणतीही निवडणूक लढवत असेल, तर त्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून एक चिन्ह दिलं जातं. इतकंच नाही तर निवडणुकीसाठी त्या पक्षाला एकसंघ गट म्हणून मान्यताही दिली जाते. विधानसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या त्या पक्षाला त्यांच्या आमदारांकडून विधीमंडळ गटनेता निवडून द्यावा लागतो. त्यानंतर हा गटनेता आपल्या गटाची विधानसभेच्या नियमाप्रमाणे नोंदणी करून घेतो. त्यानंतर त्या पक्षाला विधानसभेत गट म्हणून मान्यता मिळते.या विधिमंडळ गटातील सर्व आमदार फुटले तर विधिमंडळातील या गटाचं अस्तित्व संपुष्टात येतं. पण पक्ष कायम राहतो.

Eknath Shinde
Maharashtra Political Crisis : फ्लोअर टेस्ट म्हणजे नेमकं काय? ती कशी घेतली जाते? जाणून घ्या...

गटनेता कसा बदलता येतो?

जर संख्याबळ अपुरं असेल तर पक्ष गटनेता बदलू शकत नाही. गटनेता बदलायचा असेल तर, सर्व आमदारांची बैठक बोलवावी लागते. त्यात सर्वानुमते गटनेता बदलून नवा गटनेता निवडावा लागतो. जर आमदार फुटले असतील तर, गटनेता बदलण्याचे अधिकार पक्षप्रमुखांकडे असतात. पक्षप्रमुख याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून गटनेता बदल्याची मागणी करू शकतो.

आमदारांचं निलंबन होऊ शकतं का?

सध्या शिवसेनेकडून 17 आमदारांचं निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या 17 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष 17 आमदारांना सुनावणीसाठी नोटीस बजावू शकतात. नोटीस बजावल्यानंतर शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर स्पष्टीकरणासाठी 17 आमदारांची सुनावणी घेण्यात येईल. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) कडून उपलब्ध असलेल्या बँडविड्थनुसार, एका दिवसात 2 ते 4 आमदारांची सुनावणी घेतली जाऊ शकते.

Eknath Shinde
राज्यातील घटनांशी भाजपचा काहीही संबंध नाही; चंद्रकांत पाटील काय म्हणाले? वाचा...

कर्नाटकात काय झालं होतं?

भारतात आमदारांनी बंड केलेली घटना काही नवीन नाही. याआधी कर्नाटकात जेडीएसच्या आमदारांनी बंड केले होते. त्यामुळे या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केले होते. त्यामुळे या आमदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोर्टाने या आमदारांच्या निलंबनाला स्थगिती दिली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. मात्र, निकालापूर्वीच काही आमदारांनी याचिका मागे घेतल्याने त्यावर निर्णय आला नव्हता.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com