लग्न होऊ देणार नाही; युवासेना जिल्हाप्रमुखाची तरुणाला धमकी

श्रीरामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान विक्रम राठोड यांना कोयता दाखवून सैंदर यांनी धमकी दिल्याप्रकरण सैंदर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Yuvasena
YuvasenaSaam TV

अहमदनगर : अहमदनगरधील (Ahmednagar) युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी हिंदुराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांला दमबाजी करत लग्न होऊ न देण्याची धमकी दिली आहे. तसेच पक्षाचे काम न केल्यास तुझा काटा काढू, अशी धमकी देखील विक्रम राठोड यांनी दिली असल्याची माहिती गजेंद्र सैंदर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सैंदर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेत याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

गजेंद्र सैंदर हे गेल्या काही वर्षापासून हिंदुराष्ट्र सेनेचे (Hindu Rashtra Sena) काम करत आहेत. यादरम्यान त्यांची युवासेनेच्या राठोड यांच्यासोबत झाली. त्यानंतर राठोड यांनी सैंदर यांना शिवसेनेत प्रवेश करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सांगितले. मात्र सैंदर शिवसेनेत (Shivsena) येण्यास नकार दिल्याने राठोड यांनी तुम्ही कसे काम करता, मी पाहून घेतो असे म्हणत धमकी दिली होती.

Yuvasena
तुमच्या घरावर हातोडा का टाकू नये? राणा दाम्पत्याला BMCची नोटीस

त्यानंतर १० एप्रिल रोजी श्रीरामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान विक्रम राठोड यांना कोयता दाखवून सैंदर यांनी धमकी दिल्याप्रकरण सैंदर यांच्याविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा राजकीय दबावातून दाखल झाला असल्याचे सैंदर यांनी सांगितलं. तसेच या गुन्ह्यात न्यायालयाने सैंदर यांना जामीन मंजूर केला असल्याने तुला जामीन तर मिळाला पण आता तुझे लग्न कसे होते ते मी पाहतो, अशी धमकी राठोड यांनी दिली आहे. तसेच लग्नाआधी आणखी गुन्हे दाखल करणार असल्याचे राठोड यांनी सैंदर यांना म्हटले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com