'आमदारांना सत्तेचा माज; मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगला सोडायला लावणाऱ्यांना माफ करणार नाही'

'स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मानून आम्ही रक्ताच पाणी करत शिवसेनेचं काम करत आहोत.
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Eknath Shinde Vs Uddhav ThackeraySaam TV

लातुर : राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे सामान्य शिवसैनिक संतापले असून आमदारांना सत्तेचा माज आला असल्याची प्रतिक्रिया देत, उध्दव ठाकरेच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचे मत व्यक्त करत आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना औसा शिवसेना (Shivsena) तालुकाध्यक्ष सतीश शिंदे यांनी बंडखोर आमदारांना सत्तेचा माज आल्याचं वक्तव्य केलं आहे.

शिंदे म्हणाले, 'स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचाराला मानून आम्ही रक्ताच पाणी करत शिवसेनेचं काम करत आहोत. आमच्या कष्टामुळे आमदार झाले. मात्र, आता त्यांना सत्तेचा माज आला आला आहे. ते शिवसेनेसोबत गद्दारी करत असून या प्रकरणाबाबत शिवसैनिक या बंडखोरांना धडा शिकवणार असल्याच ते म्हणाले.

हे देखील पाहा -

तसंच एकनाथ शिंदे साहेबांनी सेनेशी गद्दारी करत आपल्यासोबत आमदार घेऊन भाजपसोबत घरोबा करण्यासाठी व सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेशी बंड केलं त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वर्षा बंगला सोडायला भाग पाडलं असून त्यांना देखील शिवसैनिक माफ करणार नाही असं ते म्हणाले आहेत.

सेनेची महत्वाची बैठक -

एकीकडे एकनाथ शिंदे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शिवाय त्यांच्या गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या देखील वाढत आहे. अशातच आता आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेनेची बैठक बोलवली असून या बैठकीसाठी सचिव, नेते, सोबत असलेले आमदार, खासदार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पक्षाची पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com