लातूरकरांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणार; पिवळे पाणी सुध्दा पिण्यायोग्य - मनपा आयुक्त

पिवळ्या रंगाच्या पाण्याबाबत आवश्यकतेनुसार टँकरची पर्यायी व्यवस्था केली आहे - अमन मित्तल (मनपा आयुक्त, लातूर)
लातूरकरांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणार; पिवळे पाणी सुध्दा पिण्यायोग्य - मनपा आयुक्त
अमन मित्तल, मनपा आयुक्त लातूर SaamTvNews

लातूर : लातूर (Latur) शहराला गेल्या दीड महिन्यापासून पिवळे पाणी मनपाकडून पुरविले जाते आहे. यावर महानगरपालिका (Latur Muncipal Corporation) योग्य ती कार्यवाही करत असून लवकरच स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाईल असे आश्वासन महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.

हे देखील पाहा :

दरम्यान, पिवळ्या पाण्याच्या बाबतीत महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल (Aman Mittal) योग्य ते सहकार्य करत नसल्याचा आरोप लातूर शहराचे महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केला होता. याबाबत आयुक्त अमन मित्तल यांनी स्पष्ट करताना सांगितले की, अपुऱ्या माहितीमुळे पदाधिकारी बोलले असतील. पण, मनपा प्रशासन पिवळ्या रंगाच्या पाण्याबाबत (Water) यावर योग्य ती कार्यवाही करत असून आता पाणीपुरवठा (Water Supply) विभाग पाणीवितरण करण्यासाठी सक्षम झाला आहे.

अमन मित्तल, मनपा आयुक्त लातूर
धक्कादायक : क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करत विवाहितेचा खून!

दरम्यान, उद्याही शहरातील काही भागात पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा झाला तरी ते पाणी पिण्यायोग्य असल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल आला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही आयुक्तांनी केले. तर, आवश्यकतेनूसार टँकरद्वारे (Tanker) पाणी पुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचे महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.