भाजपा-मनसे युती: भाजपला हवा राज्यात नवा भिडू

या भेटीमुळे मनसे आणि भाजप युतीची चर्चा आता आणखी जोर धरू लागली आहे.
भाजपा-मनसे युती: भाजपला हवा राज्यात नवा भिडू
भाजपा-मनसे युती: भाजपला हवा राज्यात नवा भिडू Saam tv news

मुंबई : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीमुळे मनसे आणि भाजप युतीची चर्चा आता आणखी जोर धरू लागलीय. राज्यात भाजपा-मनसेची नवी युती (BJP-MNS alliance) उदयास येणार असल्याच्या राजकीय वर्तुळात होऊ लागल्या आहेत. (Will there be a new BJP-MNS alliance?)

भाजपा-मनसे युती: भाजपला हवा राज्यात नवा भिडू
हॉटेलची वेळ वाढवून देण्यासाठी व्यावसायिकांचे धरणे आंदोलन

२०१९ च्या विधानसभा निवडणूकांनंतर शिवसेनेने भाजपाला डच्चू देत राज्याच शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र त्यानंतर राज्यात भाजपा पुन्हा एकदा जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने भाजपाने मनसेला साद घातल्याचे दिसत आहे. त्यासाठीच चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आज झालेली भेट कोणतीही राजकीय भेट नसून वैयक्तिक भेट असल्याचे स्पष्टीकरण चंद्रकांत दादा पाटील यांनी माध्यमांना दिलं आहे.

तर त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीदेखील माध्यमांसमोर येत 'अशी काही युती होणार असेल, तर त्याचा भविष्यात विचार केला' जाईल, असे सांगत एकप्रकारचे संकेतच दिले आहेत. तसेच ही दोन राजकीय मित्रांची केवळ भेट असल्याचं देखील नांदगावकर यांनी म्हटले आहे.

जरी मनसे आणि भाजपकडून थेट युती संदर्भात अधिकृत स्पष्टता केली जात नसली, तरी चंद्रकांत दादा आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजप आणि मनसेची युती झाल्यास शिवसेनेवर दबाव येऊ शकतो. दुसरं म्हणजे या युतीमुळे मनसेला आणि भाजपला दोन्ही पक्षांना आपल्या जागा वाढवण्यास फायदा होईल.

मात्र, ही युती झाली तर, या दोन्ही पक्षांना होणारे दुष्परिणाम मनसेवर होऊ शकतो. यामुळे मनसेला संघटनात्मक बांधणीत अडचण निर्माण होऊन कार्यकर्ते फुटण्याची देखील शक्यता तज्ञ लोक वर्तवतात. आता मनसे आणि भाजप ही युती होणार की फक्त की केवळ चर्चेपूर्ती समीकरण जुळवली जाणार ते येत्या काळात स्पष्ट होईलच, अशी प्रतिक्रिया मृणालिनी नानिवडेकर यांनी दिली आहे.

Edited By- Anuradha

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com