Breaking Buldhana : धक्कादायक! चुलत भावाच्या मदतीने मुलीने केला जन्मदात्या बापाचा खून
Breaking : धक्कादायक! चुलत भावाच्या मदतीने मुलीने केला जन्मदात्या बापाचा खून...Saam Tv News

Breaking Buldhana : धक्कादायक! चुलत भावाच्या मदतीने मुलीने केला जन्मदात्या बापाचा खून

मुलीचे तीन वेळा लग्न करून देऊनही मुलगी नांदत नव्हती. त्यामुळे आरोपी मुलीच्या बापाने तिला घरात घेण्यास नकार दिल्याने संतप्त मुलीने चुलत भावासोबत संगनमत करून जन्मदात्या बापाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे.

बुलढाणा : मुलीचे तीन वेळा लग्न करून देऊनही मुलगी नांदत नव्हती. त्यामुळे आरोपी मुलीच्या बापाने तिला घरात घेण्यास नकार दिल्याने संतप्त मुलीने चुलत भावासोबत संगनमत करून जन्मदात्या बापाचा धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे घडली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगी आणि चुलत भावाला अटक केली आहे.

हे देखील पहा :

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील सुभाषचंद्र बोस नगर येथे गुलाब रावणचवरे वय ५२ या गृहस्थांनी आपल्या लक्ष्मी नामक मुलीचे तीन वेळा लग्न करून देऊनही ती सासरी नांदत नव्हती. मुलगी संसार करत नसल्याने या मुलीचे वडील तिच्यावर नेहमी रागावत होते. यामध्ये मुलगी लक्ष्मी हरिचंद्र सरीसेराव (रा. फुलमाला जिल्हा-अमरावती) ही काल सासरी भांडण करून मलकापूर येथे तिच्या माहेरी पोहचली. वडिलांच्या घरी पुन्हा राहण्याचे प्रयत्न करत असताना तिचे वडिलांसोबत रात्री दहाच्या सुमारास वाद झाले. यावेळी मुलगी लक्ष्मी किचन मधील लोखंडी सुरी घेऊन वडिलांच्या अंगावर धावून गेली.

Breaking : धक्कादायक! चुलत भावाच्या मदतीने मुलीने केला जन्मदात्या बापाचा खून...
Breaking : मनोहर भोसलेंसह तिघांवर बारामतीत गुन्हा दाखल! पहा VIDEO

याच दरम्यान चुलत भाऊ प्रकाश साहेबराव रावणचवरे याने लक्ष्मी च्या हातातील सुरी स्वतःकडे घेऊन सख्खे काका गुलाब रावणचवरे यांच्या छातीत खूपसून त्यांचा खून केला. थोड्याच वेळात या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्या वरून रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी मृतक गुलाब रावणचवरे यांच्या १२ वर्षीय मुलीने व लक्ष्मीच्या लहान बहिणीने पोलिसात तक्रार दाखल केल्यावरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com