मलाही घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र पवारसाहेबांच्या आशिर्वादाने मी सुखरुप सुटलो - आ. शशिकांत शिंदे

"मला ज्या वेळेस घेरण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेस शरद पवारांच्या आशीर्वादामुळे मी सुखरूप सुटलो"
मलाही घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र पवारसाहेबांच्या आशिर्वादाने मी सुखरुप सुटलो - आ. शशिकांत शिंदे
मलाही घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र पवारसाहेबांच्या आशिर्वादाने मी सुखरुप सुटलो - आ. शशिकांत शिंदेSaamTV

सातारा : मला ज्या वेळेस घेरण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेस शरद पवारांच्या Sharad Pawar आशीर्वादामुळे मी सुखरूप सुटलो तेसच खासदार श्रीनिवास पाटील MP Srinivas Patil हे आत्ता महाराष्ट्राचे राज्यपाल Governor असते तर 12 आमदारांचा प्रश्न या आधीच सुटला असता असे वक्तव्य आमदार शशिकांत शिंदे यांनी आज केले. With the blessings of Pawar, I escaped safely Shashikant Shinde

हे देखील पहा-

जावली Javali तालुक्यातील कुडाळ येथे एका ओपन जिम व बालोद्यानाचा लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात आमदार शशिकांत शिंदे यांनी जावळीच्या राजकारणावरती राजकीय विधान केलं आहे. या विधानात त्यांनी भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले MLA Shivendra Raje Bhosale यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे शिंदे म्हणाले मला ज्या ज्या वेळेस घेरण्याचा प्रयत्न केला गेला त्या वेळेस शरद पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिल्यामुळे मी त्यातून सुखरूप बाहेर पडलो असे विधान आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे.

मलाही घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र पवारसाहेबांच्या आशिर्वादाने मी सुखरुप सुटलो - आ. शशिकांत शिंदे
नागपूरच्या ताजबाग परिसरात मुस्लिम नागरिकांची तुफान गर्दी; कोरोना नियमांना हरताळ!

सध्या राज्यात राज्यपालांच्या बारा आमदारांचा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे यावर आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्यपाल कसा? असावा  खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासारखा असावा असे सांगत ते म्हणाले महाराष्ट्राचे राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील असते. तर अनेक दिवसांपासून बारा आमदारांचा असणारा प्रलंबित प्रश्न याआधीच मार्गी लागला असता अशा आताच्या राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com