डोंबिवली : सीसीटीव्हीच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात दोन महिन्यांनी विष्णुनगर पोलिसांना यश आले आहे. किसन व्हनकोरे (वय 25) असे आरोपीचे नाव असून नवी मुंबई परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे.
हे देखील पहा -
डोंबिवली पश्चिमेत 6 जुलैला घरफोडीची घटना घडली होती. बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरातील 1 लाख 26 हजार रुपये किमतीचे सुमारे 4 तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने घेऊन चोरटा पसार झाला होता.
सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या साहाय्याने विष्णुनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे, पोलीस हवालदार आर.पाटणकर, एच.नलावडे, एस.नाईकरे, पोलीस नाईक बी.सांगळे यांच्या पथकाने माहिती घेत नवी मुंबईतील धाकटा खांदा परिसरात सापळा रचून अटक केली.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.