Yavatmal: दागिने लुटून केला महिलेचा खून? शेतात सापडला मृतदेह!

पुसद तालुक्यातील आरेगाव येथील बेलफुल वाटणारी वृद्ध महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती.
Yavatmal: दागिने लुटून केला महिलेचा खून? शेतात सापडला मृतदेह!
Yavatmal: दागिने लुटून केला महिलेचा खून? शेतात सापडला मृतदेह! संजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ - पुसद Pusad तालुक्यातील आरेगाव येथील बेलफुल वाटणारी वृद्ध महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. आज बुधवारी अखेर तिचा ऊसाच्या शेतात मृतदेह आढळून आला. अज्ञात चोरट्याने सोन्या व चांदिचे दागीने हिसकावून घेऊन खून Murder केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

हे देखील पहा-

पुसद पासून आठ कि.मी. अंतरावरील आरेगाव Aregaon येथील यशोदाबाई कोंडबा सातव (वय ६० वर्षे) ही विधवा महिला दररोज लोणी Loni ह्या गावात बेलफुल वाटायची. दरम्यान परवा सोमवारी भरपूर पाऊस पडत असल्याने काही काळ लोणी येथे थांबल्या होत्या. पावसाने Rain उघडीप देताच आपल्या गावाकडे त्या निघाल्या.

Yavatmal: दागिने लुटून केला महिलेचा खून? शेतात सापडला मृतदेह!
Wardha: जुगाडू इंजिनिअरचा त्याच्याच यंत्राने घेतला बळी!

दागिने हिसकावून खून केल्याचा संशय!

परंतु दोन दिवसांपासून त्या घरी परतल्या नसल्याने नातेवाईकांनी त्यांच्या शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर त्या महिलेचे प्रेत महादेव मंदिरालगत असलेल्या जोडरस्त्यावरील संजय चिद्दरवार यांच्या शेतात बुधवारी आढळून आला. महिलेच्या गळ्यात असलेले सोन्याची पाने, हातातील चांदीचे कडे व पाटल्या अज्ञात चोरट्याने हिसकावून घेऊन तिचा पाय बांधला आणि खून केला असल्याचा संशय प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तिच्या पश्चात एक विवाहीत मुलगी आहे. घटनास्थळी शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले असून शवविच्छेदन अहवाला नंतरच मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com