
लातुर: जिल्ह्यातील उदगीर येथील एका ऊसतोड महिला मजुराने मुकादमाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. उपचारा दरम्यान काल सायंकाळी महिलेचा मृत्यू (Death) झाला आहे. याबाबत उदगीर शहर पोलीस (Police) ठाण्यात मुकादमासह त्याचा भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील पाहा-
उदगीरातील फुलेनगरात वास्तव्याला असलेल्या महिलेला एका मुलीसह आईसोबत फुलेनगरात राहत होती. त्या आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी ऊसतोड मजूर म्हणून लक्ष्मण राठोड याच्या टोळीत काम करत होती. त्यांनी रविवारी आईला फोनवर सांगितले, मला काम खपत नाही, मी परत उदगीरला (Udgir) येत आहे. मुकादमाचे पैसे माझ्याकडे निघत आहेत, घरी आल्यावर जोड करून पैसे देणार असल्याचे सांगितले होते.
सायंकाळच्या सुमारास लक्ष्मण राठोड याने महिलेस घरी आणून सोडले आणि पैसे वेळेवर दे, म्हणून धमकावले बहिणीने असे शांत- शांत असण्याचे कारण विचारले. महिलेने घरी आल्यानंतर ती शांतच होती. पैसे देण्याच्या कारणावरून मुकादम लक्ष्मण राठोड, राम राठोड यांनी शारीरिक व मानसिक त्रास दिला होता.
सोमवारी दुपारच्या सुमारास गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न करताना बहिणीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या महिलांनी धाव घेत तिचा गळफास काढला. उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कारवाईची मागणी होत आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.