धावत्या रेल्वेतच महिलेनं दिला गोंडस बाळाला जन्म; आई-बाळ दोघेही सुखरुप

Nanded News : नांदेडमध्ये धावत्या रेल्वेमध्येच एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना बुधवारी (२७ एप्रिल) दुपारी घडली आहे.
Nanded Train
Nanded TrainSaam Tv

नांदेड: एखाद्या महिलेची रेल्वेत प्रसुती होण्याची घटना तशी दुर्मिळच आहे. मात्र, नांदेडमध्ये धावत्या रेल्वेमध्येच एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना बुधवारी (२७ एप्रिल) दुपारी घडली आहे. सुदैवाने या महिलेला वेळेत डॉक्टरांची मदत मिळाल्यामुळे प्रसुती व्यवस्थित पार पडली. आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. परळी ते आदिलाबाद प्रवासादरम्यान ही घटना घडली आहे. (Woman Gives Birth on Running Train In Nanded)

Nanded Train
पुण्यात एसटीचा ब्रेक फेल; पाच ते सात गाड्यांना दिली धडक

याबाबत, सविस्तर वृत्त असे की, भोकर तालुक्यातील बटाळा येथील नाजुकाबाई अनिल कवडेकर ही गर्भवती महिला पती दोन मुलींना सोबत घेऊन रेल्वेने भोकर येथून किनवटकडे माहेरी जात होती. मात्र प्रवासादरम्यान, या महिलेला रेल्वेतच प्रसुती कळा येण्यास सुरुवात झाली. याचवेळी इस्लापुर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर प्रदीप शिंदे हे याच रेल्वेने प्रवास करत होते. तेव्हा त्यांनी महिलेच्या पतीला विश्वासात घेऊन इतर काही महिलांच्या मदतीने रेल्वेतच या महिलेची सुखरूपपणे प्रसूती केली.

प्रसुतीदरम्यान, या महिलेनं एका बाळाला जन्म दिला. मात्र प्रसुतीनंतर रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी तातडीने त्यांना हिमायतनगर इथल्या प्राथमिक रुग्णालयात दाखल केलं. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आलं आहे. रेल्वेत प्रसुती झालेल्या नाजुकाबाई यांना मिळालेल्या डॉक्टरांची आणि सह प्रवाशांची मदत महत्वाची ठरली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com