बीडमधील 35 हजार महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवून देणारी ऊसतोड मजुराची कन्या

बीडमधील ऊसतोड कामगाराची मुलगी मनीषा घुले यांनी बचतगटाच्या चळवळीतून हजारो कुटुंबाला आधार दिला आहे. त्यांच्या या कामामुळे बीडच्या गावखेड्यातील महिला सक्षम झाल्या आहेत. तर कोरोनामध्ये सुरक्षित सुद्धा राहिल्या.
बीडमधील 35 हजार महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवून देणारी ऊसतोड मजुराची कन्या
बीडमधील 35 हजार महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवून देणारी ऊसतोड मजुराची कन्याविनोद जिरे

विनोद जिरे

बीड - बचत गटाच्या माध्यमातून 35 हजार कुटुंबाना कोरोनाच्या संकटात आर्थिक स्थैर्य मिळवून देत, सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्या मनीषा घुले ग्रामीण भागातील महिलांसाठी देवदूत ठरल्या आहेत. स्वतःला कोरोना झाल्यानंतर देखील न खचता जिद्दीने 300 गावखेड्यातील महिलांना बचतगटाच्या माध्यमातून त्या समृध्द करत आहेत. कोरोनाच्या संकट काळात हातचे काम गेले, अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत होते. याच कुटुंबांतील महिलांना रोजगार देऊन आर्थिक दृष्ट्या त्यांनी सक्षम केलंय. Woman provided financial stability to 35 thousand women in Beed

हे देखील पहा -

बीड जिल्ह्यातील चार लाख ऊसतोड मजूर, प्रत्येक वर्षी पोटाची खळगी भरण्यासाठी, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक या ठिकाणी ऊसतोडणीसाठी जातात. सततचा दुष्काळ व नापिकी यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या, बीड जिल्ह्यातील गाव खेड्यातील महिलांना एकत्रित करून, बचत गटाची चळवळ 300 गावामध्ये सक्रिय करणाऱ्या मनीषा घुले, यांच काम महिलांना समृद्ध करणारे आहे.

साडेतीन हजार बचत गटाच्या माध्यमातून आज 35 हजार कुटुंबांना त्यांनी आर्थिक स्थैर्य दिले आहे. नाबार्ड या शासनाच्या संस्थेसोबत काम करत असताना, नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र उभारणी केली. आज यामधून बीड जिल्ह्यातील महिलांचे सक्षमीकरण होत आहे. यात 3 हजार 'एकल' महिलांच्या आरोग्यासाठी तपासणी, मास्क व सॅनिटीझर देत कोरोनाच्या संकटात मनीषा घुले यांनी त्यांची काळजी घेतली आहे.

बीडमधील 35 हजार महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवून देणारी ऊसतोड मजुराची कन्या
चितोडा प्रकरणी लवकरच जिल्हास्तरीय आंदोलन ?

बीडच्या केज तालुक्यातील बेलगावच्या रहिवासी असणाऱ्या व स्वतः ऊसतोड मजुराच्या पोटी जन्म घेतल्यामुळे, त्यांचे दुःख, महिलांच्या समस्या, आर्थिक चणचण या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे, त्यांनी 2008 पासून ऊसतोड मजूरासंदर्भात व महिलांसाठी काम करायचं ठरवलं. तेव्हापासून गावखेड्यात जाऊन त्यांची आरोग्य तपासणी, त्याचबरोबर त्यांच्यावर होणारे अन्याय-अत्याचार याला वाचा फोडण्याचे काम केलं. आणि ते काम आजतागायत करत आहेत.

हे काम करत असताना त्यांनी नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राची सुरुवात केली. याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात आल्यामुळे त्यांनी बचत गटाची चळवळ सुरू केली. आज ही चळवळ बीड जिल्ह्यातील 300 गावापर्यंत जाऊन पोहचली आहे. या तीनशे गावातील तब्बल 35 हजार महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.

मनीषा घुले यांच्या या कामाबद्दल केज शहरात राहणाऱ्या सारिका गायके म्हणाल्या, की कोरोनाच्या संकटात पतीचे काम गेल्यामुळे, घरात आर्थिक अडचण निर्माण झाली होती. काम कुठेही मिळत नव्हते, त्यावेळी मनीषा घुले यांनी नवचेतना प्रकल्पामध्ये, आम्हाला टाकाऊ कपड्यापासून पिशवी, त्याचबरोबर इतर उपयोगी साहित्य बनवण्याचे काम दिले. तसेच मास्क बनवणे, पेटी कोट बनवणे हे काम आज आम्ही करत आहोत. यात घरीच आम्हाला हे काम करता येत असल्यामुळे, बाहेर जाण्याची गरज लागत नव्हती शिवाय सुरक्षित देखील होतो. यात दररोज आम्हला 250 रुपये मिळायचे, तर महिन्याचे 7 हजार 500 रुपये मिळायचे यामुळे घर खर्च भागला. असं या प्रकल्पात काम करणाऱ्या सारिका गायके यांनी सांगितले.

कुठेच रोजगार उपलब्ध होत नव्हता, हातावर पोट असणाऱ्या मजुरांची उपासमार होत होती. त्यामुळे आम्ही मास्क निर्मिती सुरू केली. महिलांना घरी बसून ट्रेनिंग दिले. घरी बसून त्यांच्याकडून मास्क तयार करून घेतले. यामध्ये 50 ते 60 महिलांना रोजगार दिला. मी या प्रकल्पात सुपरवायझर म्हणून काम करत आहे. माझ्यासोबत 20 ते 25 महिला शिवण काम करत आहेत. त्यांनादेखील वेळेच्या वेळेवर रोजगार मिळाल्यामुळे. आज कुटुंब चांगले आहेत. असं शितल लांडगे यांनी सांगितलं. टाकाऊ कापड्या पासून कापडी पिशव्या शिवण्याचे काम दिले आहे. आज हजार महिलांना आम्ही रोजगार देऊ शकलो. असं लक्ष्मी बोरा यांनी सांगितलं आहे.

कोरोनाच्या संकटात आज 35 हजार कुटुंब संस्था सोबत जोडले गेले आहे. त्यांची सुरक्षा खूप महत्त्वाची होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये घरोघरी जाऊन सोशल डिस्टंसिंग, मास्क वापर, लोकांना जागृत करण्याचे काम केले. नवचेतनाची टीम कशा पद्धतीने सुरक्षित राहिल, यासाठी प्राधान्य दिले. बहुतांशी 90 टक्के महिला कोरोना पासून दूर राहिल्या होत्या.फक्त 10 % महिला covid पॉझिटिव्ह आल्या, त्यातील दोन महिलांच निधन झालं.

बाकी सगळ्या महिला सुरक्षा ठेवण्यात आम्हाला यश आले असं मनीषा घुले सांगतात. यासाठी त्यांच्याशी बोलणं फोनवर चर्चा करून त्यांच्या गाठी भेटी घेणे.अशा पद्धतीने मी त्यांना सहकार्य केले. तसेच आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याकरता, मी त्यांना वेगळ्या पद्धतीने सपोर्ट पण केला. जेणेकरून त्यांच आरोग्य तितकच महत्त्वाचं होतं. आणि परिस्थिती महत्वाची होती. हे सगळं सुरळीत करण्यासाठी संस्थेच्या टीमने प्रयत्न केले.

बचतगटाच्या माध्यमातून छोटे छोटे व्यवसाय उभा करतो आहोत. यात पार्लर,गाय, म्हैस, शेळी पालन व्यवसाय, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय, त्याच्या सोबतच नवचेतना महिला उद्योग म्हणून आम्ही युनिट सुरू केला आहे. त्याच्या अंतर्गत महिलांना पेटिकोट, लेगिन्स, पिशवी शिवण्याचे काम दिलं. अशा पद्धतीने मी आतापर्यंत जवळपास साडे दहा हजार महिलांना, वेगवेगळे व्यवसाय उभा करून देण्यात मदत केली आहे. यांच्याही व्यवसायावर कोरोनाचा परिणाम झाला, परंतु शक्यतो महिलांना घरी बसल्या, उन्हाळी काम यात पापड, कुरडई, शेवया, पापडी, बनवण्याचे काम केले. त्याचं मार्केटिंग संस्थेअंतर्गत केल आहे. त्याचा मोबदला त्यांना मिळाला असं मनिषा घुले यांनी सांगितलं.

ऊसतोड कामगाराची मुलगी मनीषा घुले यांनी बचतगटाच्या चळवळीतून हजारो कुटुंबाला आधार दिला आहे. तर जोडीदार हरवलेल्या महिलांना कोरोनाच्या संकटात सुरक्षा दिली आहे. त्यांच्या या कामामुळे आज गावखेड्यातील महिला सक्षम झाल्या आहेत. तर कोरोनामध्ये सुरक्षित सुद्धा राहिल्या.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com