Breaking Nashik | नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत, कारमध्ये नेऊन बलात्कार!

संपूर्ण राज्यभरात बलात्कारांच्या घटनांनी आक्रोशाचे वातावरण असताना आता नाशिकमध्ये देखील बलात्काराची घटना समोर आली आहे.
Breaking Nashik | नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत, कारमध्ये नेऊन बलात्कार!
Breaking Nashik | नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत, कारमध्ये नेऊन बलात्कार!SaamTv

नाशिक : संपूर्ण राज्यभरात बलात्कारांच्या घटनांनी आक्रोशाचे वातावरण असताना आता नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) तालुक्यामधील शहा शिवारात एका महिलेला एका नराधमाने दुचाकीवरून जात असताना अडवून तिच्यावर कारमध्ये नेऊन बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणी वावी ठाण्यात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Complaint lodged, Woman raped in car in Sinnar, Nashik)

हे देखील पहा :

सविस्तर घटना :

सिन्नर तालुक्यातील शहा शिवार परिसरात सोमवारी पीडित महिला तिच्या दुचाकीवरून पंचाळे-कोळपे रोडवरून जात होती. यावेळी संशियत आरोपी प्रशांत राजाराम सांगळे (रा. माळेगाव, ता. सिन्नर) याने या महिलेचा कारने पाठलाग सुरू केला. या पीडितेला गाठून तिच्या दुचाकीसमोर त्याने कार आडवी लावली. पीडितेला जबरदस्तीने आपल्या कारमध्ये टाकून त्याने दरवाजे बंद करून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी पीडितेने त्याचा प्रतिकार केला आणि स्वतःच्या बचावासाठी आरडाओरडा केला.

Breaking Nashik | नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत, कारमध्ये नेऊन बलात्कार!
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच

मात्र, या नराधमाने तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवला. सोबतच महिलेचे नग्न अवस्थेतील फोटो मोबाइलमध्ये काढले. या प्रकरणाची कुठे वाच्यता केली, तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देखील त्याने पीडितेला दिली. या घटनेबाबत महिलेने वावी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी कलम 341, 376, 506 प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com