वारणा नदी पात्रात महिलेचा मृतदेह आढळला; पाेलिस घटनास्थळी दाखल

वारणा नदी पात्रात महिलेचा मृतदेह आढळला; पाेलिस घटनास्थळी दाखल
dead body

सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कणेगाव- भरतवाडी वारणा नदी पात्रात एका महिलेेचे शव वाहून आल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ही माहिती कुरळप पोलिस ठाण्यात कळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात असणाऱ्या झुडुपात अडकलेले शव काढायचे कसे असा प्रश्न पोलिसांपुढे उपस्थित झाला हाेता. (womans-dead-body-found-warna-river-kurlp-police-sangli-news)

यावेळी पोलिसांनी भरतवाडी गावचे पोलिस मित्र रविंद्र निकम यांच्या साहाय्याने शव बाहेर काढण्यात यश आले. या महिलेची ओळख पटलेली नाही. ही महिला कोण आणि कुठली आहे. हा घातपात आहे की अन्य काय याचा तपास कुरळप पोलिस करीत आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com