भिक्षेकऱ्याच्या पाठीवर महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांचा मायेचा हात

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सातारा या ठिकाणी भिक्षेकरी गृहाला भेट
भिक्षेकऱ्याच्या पाठीवर महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांचा मायेचा हात
भिक्षेकऱ्याच्या पाठीवर महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांचा मायेचा हातओंकार कदम

सातारा : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सातारा या ठिकाणी भिक्षेकरी गृहाला भेट दिली. बालविकास आयुक्तालय पुणे संचलित या भिक्षेकरी गृहातील वृद्धांची आस्थेनं चौकशी करत विचारपूस  केली आहे. त्यांना काय समस्या आहेत.

हे देखील पहा-

त्यांची माहिती घेऊन त्या समस्या सोडवण्याचे तातडीने आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. विविध कारणांनी बेघर झालेल्या तसेच परिस्थितीमुळे ठिकाणी भिक्षा मागणाऱ्याची रवानगी भिक्षेकरी गृहात करण्यात येते. अशा वृध्दांना त्यांच्या भविष्यासाठी  व्यक्तिगत विकासाच्या अनेक योजना शासनामार्फत राबविल्या जातात.

भिक्षेकऱ्याच्या पाठीवर महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांचा मायेचा हात
पुण्यात कधी होणार मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा.. चला जाणून घेऊयात

वृद्धांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी राज्याचे महिला आणि बालविकास विभागामार्फत सातत्याने प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवरच एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी या वृद्धांची विचारपूस करून त्यांना धीर दिला आहे. भविष्यातील संधीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच काहीही मदत लागल्यास विभागामार्फत त्याची पूर्तता होईल, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com