दारू आणि कोंबड्यासह महिला व अपंगांचा धडकला भादा ठाण्यावर मोर्चा

भादा स्टेशन अंतर्गत असलेल्या 45 गावांमध्ये खुलेआम दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार हे उध्वस्त होत आहेत यामुळे 45 गावातील महिला, अपंग पुरुष, युवक-युवतींचा मोर्चा धडकला आहे.
दारू आणि कोंबड्यासह महिला व अपंगांचा धडकला भादा ठाण्यावर मोर्चा
दारू आणि कोंबड्यासह महिला व अपंगांचा धडकला भादा ठाण्यावर मोर्चादीपक क्षीरसागर

लातूर: जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा स्टेशन अंतर्गत असलेल्या 45 गावांमध्ये खुलेआम दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार हे उध्वस्त होत आहेत यामुळे 45 गावातील महिला अपंग पुरुष युवक युवतीचा मोर्चा धडकला आहे. औसा तालुक्यातील भादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून आज मोर्चाला सुरुवात केली. या मोर्चात सहभागी असलेल्या महिलांनी अक्षरश: देशी दारूच्या बाटल्या व कोंबडी डोक्यावर टोपलीत मध्ये घेऊन भादा ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. (Women and the disabled marched on Bhada Thane with alcohol and hens)

हे देखील पहा -

या मोर्चामध्ये महिला युवक-युवती यांचा आक्रोश आणि संताप पाहायला मिळाला. भादा ठाण्याच्या आवारातच मुख्य इमारती समोर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदीप पाटील खंडापूरकर महिला सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सोनाली गुलगुले, माधुरी पाटील, राणी स्वामी, रामप्रसाद दत्त, प्रा विजय सुतार, चंद्रकांत ढवण यांच्यासह 45 गावातील महिला-पुरुष युवक-युवती व अपंग यांनी ठिय्या मांडला.

दारू आणि कोंबड्यासह महिला व अपंगांचा धडकला भादा ठाण्यावर मोर्चा
दारू आणि कोंबड्यासह महिला व अपंगांचा धडकला भादा ठाण्यावर मोर्चादीपक क्षीरसागर

यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी दारुमुळे कशा पद्धतीने कुटुंबाची राखरांगोळी होत आहे याबद्दल आक्रोश आणि संताप व्यक्त केला. काही बेवड्यांनी दारूच्या नादात शेती विकली तर महिला व मुलांना मारहाण हा नेहमीचा भाग आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत 45 गावात अवैधपणे देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री होते. या अवैध दारू विक्रेत्यांना पोलिस प्रशासनाकडून हप्ते घेऊन संरक्षण दिला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. लातूर जिल्ह्यात निखील पिंगळे यांनी पोलिस अधीक्षक पदांचा पदभार घेतल्यानंतर अवैद्य धंदे विरुद्ध मोठी मोहीम राबवत कारवाई सुद्धा केली. यामुळे अवैध धंदेवाल्याचे धाबे दणाणले पण भादा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू, गुटका, मटका, गांजा यांचे मोठ्या प्रमाणात विक्री होते.

दारू आणि कोंबड्यासह महिला व अपंगांचा धडकला भादा ठाण्यावर मोर्चा
अजित पवार यांना केवळ पैसा कळतो : चंद्रकांत पाटील

वर्षाकाठी सरासरी 50 लोकांचा यात जीव जातो, त्यावर अवलंबून असणारे 250 व्यक्ती यांचे देखील जीवन उद्ध्वस्त होते. यामुळे या ठाण्याच्या हद्दीत असलेले बीट अंमलदार गिरी आणि डोलारे यांची तात्काळ बदली करण्यात यावी व एक महिन्याच्या आत सर्व अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा छेडण्याचा इशारा दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com