अकोल्यात हनी ट्रॅप, त्या महिलेच्या "लीला" चव्हाट्यावर

अकोल्यात हनी ट्रॅप, त्या महिलेच्या "लीला" चव्हाट्यावर
क्राईम न्यूज

अहमदनगर ः गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात हनी ट्रॅप Honey Trap प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सावज हेरायचे आणि नंतर त्याला घरी बोलावून ब्लॅकमेल करायचे असे प्रकार उघडकीस येत आहेत. प्रकरण अकोले तालुक्यातील असेच एक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी दोन महिलांसह एका आरोपीला अटक केली आहे.

संबंधित आरोपींना पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर येते आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.

या प्रकरणात फसवले गेलेल्यांची संख्या वाढणार आहे. अकोल्यातील एका मध्यमवयीन व्यक्तीला फसवले होते. त्यामुळे हे प्रकरण उजेडात आले. परंतु त्याच महिलेने एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यालाही गंडवले आहे. पोलिस तपासात तसे निष्पन्न झाले आहे. तो तक्रार देण्यास पुढे आल्यास या प्रकरणावर प्रकाश पडू शकतो.Women arrested in Honey Trap case in Sangamner

क्राईम न्यूज
ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरल्याने पवारांनी भाजपला खिजवलं

अशी करायच्या फसवणूक

हनी ट्रॅप करणाऱ्या महिला सोशल मीडियातून मैत्री करतात. अनोळखी व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. त्यांनी ती स्वीकारल्यानंतर गप्पांतून ओळख वाढवली जाते. त्याला घरी किंवा प्लॅटवर चहापानासाठी बोलावले जाते. तेथे बेसावध क्षणी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाते. त्या रेकॉर्डिंग दाखवून ब्लॅकमेलिंग केले जाते.

पैसे न दिल्यास गुन्हा

सावज जाळ्यात ओढूनही तो पैसे देत नसल्यास त्याच्यावर गुन्हे केले जातात. संगमनेर तालुक्यात असेच गुन्हे त्या महिलेने दाखल केले आहेत. त्यामुळे पीडित लोकं तिच्यापासून सावध राहत होती. या महिलेविरूद्ध खंडणीचा गुन्हाही दाखल आहे. संबंधित महिलेचा पती अपघातात मरण पावला आहे. त्यानंतर तिने हा उद्योग सुरू केला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.Women arrested in Honey Trap case in Sangamner

समोर कसे आले प्रकरण

अकोले तालुक्यातील एक शेतकरी आहे. तो संबंधित महिलांच्या संपर्कात आला. त्यांनी त्याला एका प्लॅटवर बोलावून घेतले. तेथे त्याला जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. इतर आरोपींनी त्याचे अश्लिल व्हिडिओ बनवले. आणि त्याद्वारे दोन लाख रूपयांची खंडणी मागितली. त्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी त्याला मारहाण केली. त्यामुळे त्याने ३० हजार रूपये काढून दिले. उर्वरित पैसे देण्यासाठी त्यांनी लकडा लावला होता. हा त्रास असह्य झाल्याने पीडित व्यक्तीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सापळा रचून सुभाष शिंदे (रा. जोर्वे, संगमनेर) व रावसाहेब पंढरीनाथ सटाले (रा. संगमनेर) या दोघांना रंगेहाथ पकडले. नंतर त्या महिलेलाही ताब्यात घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com