
सचिन बनसोडे, अहमदनगर
Ahmednagar News: अहमदनगरमध्ये (Ahmednagar) कारच्या भीषण अपघातामध्ये (Car Accient) एकाचा मृत्यू तर चौघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. काजवा महोत्सव पाहून घरी परत येत असताना हा अपघात झाला आहे. अहमदनगरच्या अकोले तालुक्यात ही घटना घडली आहे. या अपघाताचा तपास अहमदनगर पोलिसांकडून (Ahmednagar Police) सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काजवा महोत्सव पाहून घरी परतणाऱ्या पर्यटकांवर काळाने घाला घातलाय. अकोले तालुक्यातील नवलेवाडी शिवारात कोल्हार - घोटी राज्यमहामार्गावर कारला अपघात झाला. पुण्यामधील एक कुटुंब अहमदनगर येथे काजवा महोत्सव पाहण्यासाठी आले होते. हा महोत्सव पाहून परत येत असताना ही घटना घडली. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झालेत. रेखा लाहोटी (वय वर्षे ४१ ) असे मृत महिलेचे नाव आहे.
सध्या भंडारदरा परिसरात काजवा मोहत्सव सुरू आहे. हा मोहत्सव बघण्यासाठी राज्यभरातून पर्यटक भंडारदरा येथे येत असतात. पुणे येथील काही पर्यटक हा मोहत्सव बघण्यासाठी आले होते. काजवा मोहत्सव पाहून घरी परतत असताना या पर्यटकांच्या कार क्रमांक एमएच १२ - एस यु - ८८८२ या गाडीला शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. कार अकोले तालुक्यातील नवलेवाडी शिवारात आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार एका वडाच्या झाडाला धडकली.
अपघाताच्या आवाजाने स्थानिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र गाडीतील एअर बॅग फुटून गेल्या होत्या. तसेच सर्व दरवाजे लॉक झाले होते. जखमींना गाडीबाहेर काढणे अवघड झाल्याने गाडीच्या दरवाजांमध्ये लोखंडी पहार घालून दरवाजे उघडण्यात आले. जखमींवर संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, काजवा मोहत्सव बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक भंडारदरा परिसरात येत आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेऊन सुरक्षितपणे वाहने चालवावीत, असे अवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आल आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.