Railway News: विदर्भ एक्सप्रेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ, कसारा स्थानकातील घटना

VIDARBHA EXPRESS : महिलेच्या मृत्यूबाबत दादर येथे असलेल्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहे.
Kasara Railway Station
Kasara Railway StationSaam tV

कसारा : गोंदियाहून(Gondia) मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये प्रवासी महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रेन कसारा रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली होती. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

विदर्भ एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने एक्सप्रेस कसारा स्टेशनवर थांबवण्यात आली होती.दरम्यान ट्रेनमध्ये एक महिला प्रवासी मयत झाल्याचं आढळून आले आहे. सदर मयत महिला ट्रेनमध्ये एकटीच प्रवास करत होती. महिलेचा मृतदेह कसारा रूग्णालयात हलवण्यात आला आहे . या मृत्यूबाबत दादर येथे असलेल्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहे.  (Breaking Marathi News)

Kasara Railway Station
Dhule Accident Update: नदीपात्रात पडलेला ट्रक 12 तासांनंतरही सापडेना; महत्त्वाची कागदपत्र पोलिसांच्या हाती

तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विदर्भ एक्सप्रेस कसारा रेल्वे स्टेशनला उभी होती. याचा लोकल ट्रेन वाहतूकीवर कोणताही परिणाम झाला नाही. तर या एक्सप्रेसमधील सर्व प्रवाशांना बलिया एक्सप्रेसने कल्याणच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. विदर्भ एक्सप्रेसचे इंजिनचे दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com