Leopard: दिल्ली मोहल्ला परिसरातील घरात शिरला बिबट्या; महिला ठार
leopard Saam tv

Leopard: दिल्ली मोहल्ला परिसरातील घरात शिरला बिबट्या; महिला ठार

वाघ-बिबट्यांच्या तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी गावक-यांनी केली आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर (chandrapur) शहरालगत दुर्गापूर (durgapur) येथे बिबट्याने (leopard) केलेल्या हल्ल्यात घरकाम करत असलेली महिले (women) ठार झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यासह शहरातील विविध भागात बिबट्याच्या हल्ले हाेत असल्याने परिसरातील नागरिकांची घाबरगुंडी उडाली आहे. (chandrapur leopard latest marathi news)

दुर्गापूर येथील दिल्ली मोहल्ला येथे वास्तव्यास असणा-या गीता विठ्ठल मेश्राम (वय ४७) या घरात काम करीत हाेत्या. रात्रीची वेळ असल्याने परिसरातील अंधाराचा फायदा घेत बिबट्याने घरात शिरुन मेश्राम यांचा नरडीचा घोट घेतला.

leopard
गरज लागेल त्यांना पक्ष भाड्याने मिळताे; राऊतांनी उडवली 'मनसे' ची खिल्ली

या घटनेची माहिती समजताच वनपथक व पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी शाेध घेतला परंतु बिबट्या पसार झाला हाेता. वनविभागाने यापुर्वी एक वाघ आणि एक बिबट जेरबंद केला हाेता. या परिसराला लागून आहेत वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या कोळसा खाणी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रातून वन्यजीवांचा परिसरात प्रवेश हाेत असताे. वाघ-बिबट्यांच्या तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी गावक-यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

leopard
Raju Shetti: धर्माच्या नावाखाली राजकीय पोळी भाजली जात आहे : राजू शेट्टी
leopard
असा सुटला असता भाेंग्याचा प्रश्न, राज ठाकरेंची इच्छाच नाहीये : बच्चू कडू
leopard
मुंबईकरांनाे! APMC त आंबा झाला स्वस्त; जाणून घ्या दर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.