अनवाणी पायाने महिला मॅरथॉन स्पर्धेत धावली; पहिल्या क्रमांकावर मारली बाजी

परभणीमध्ये (Parbhani) पाच किलोमीटर मॅरथॉन स्पर्धेमध्ये ४५ वर्षीय महिलेने प्रथक क्रमांक पटकावून १० हजारांचे बक्षीस जिंकले आहे.
Parbhani news
Parbhani news saam tv

Parbhani News : परभणीमध्ये (Parbhani) पाच किलोमीटर मॅरथॉन स्पर्धेमध्ये ४५ वर्षीय महिलेने प्रथक क्रमांक पटकावून १० हजारांचे बक्षीस जिंकले आहे. वयाने ४५ वर्ष पूर्ण केलेल्या महिलेने अनवाणी पायाने धावून पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविल्याने उपस्थित नागरिकांचे मने जिंकली आहेत. कुठलीही पूर्व तयारी न करता अनवाणी पायाने धावत त्यांनी ही मॅरेथॉन स्पर्धा जिंकली आहे. त्यांचा स्पर्धेत धावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Parbhani news
Jalna News : दावणीला बांधलेल्या बैलासमोर नागाने काढला फणा; पुढे काय झालं? पाहा VIDEO

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिम्मित सोनपेठ नगर पालिकेने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत 45 वर्षीय मंगल आव्हाड नावाच्या महिलेने प्रथम क्रमांक पटकावून 10 हजारांचे बक्षीस जिंकले आहे. कुठलीही पूर्व तयारी न करता मंगल यांनी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी अनवाणी पायाने धावून मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. महिलेने अनवाणी पायाने धावून स्पर्धा जिंकल्याने नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.त्यांचा स्पर्धेत धावातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Parbhani news
पुण्याच्या लेकीची उत्तुंग भरारी; युरोप खंडातील सर्वोच्च शिखर एल्ब्रुसवर फडकवला तिरंगा

दरम्यान, मॅरेथॉन स्पर्धा संपली तेव्हा त्यांनी पायाकडे बघितले तर जोडव्यामुळे रक्त निघत होते. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या पायाकडे पाहिल्यानंतर त्यांचेही मनही हेलावले आहे. त्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या या जिद्दीला उपस्थितांनी सलाम करायला सुरुवात केली. मंगल आव्हाड यांनी स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आव्हाड म्हणाल्या, 'अशा प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होण्याचे माझे बालपणापासून स्वप्न होते. परंतु संधी मिळाली नव्हती. मॅरेथॉन स्पर्धेने माझे स्वप्न पूर्ण झाले. पारितोषिकाच्या रक्कमेपेक्षा माझी ओळख निर्माण झाली हे माझ्यासाठी महत्वाचे आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com