महिला काँग्रेसच्या वतीनं चुलीवर स्वयंपाक करून गॅस दरवाढीचा निषेध

वाढत्या महागाईच्या विरोधात रेणापुर तालुका महिला काँग्रेसच्या वतीने येथील तहसिल कार्यालया समोर चुलीवर स्वयंपाक करून गॅस दरवाढीचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.
महिला काँग्रेसच्या वतीनं चुलीवर स्वयंपाक करून गॅस दरवाढीचा निषेध
महिला काँग्रेसच्या वतीनं चुलीवर स्वयंपाक करून गॅस दरवाढीचा निषेधदीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : केंद्रातील भाजपा BJP सरकारने पेट्रोल डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्य तेलासह इतर वस्तुच्या किंमती भरमसाठ वाढल्या. यामुळे गोरगरीब जनतेचे जगणे कठीण झाले आहे. वाढत्या महागाईच्या विरोधात रेणापुर तालुका महिला कॉग्रेसच्या वतीने येथील तहसिल कार्यालया समोर चुलीवर स्वयंपाक करून गॅस दरवाढीचा निषेध करत आंदोलन Agitation करण्यात आले.

हे देखील पहा-

गोरगरीब व सर्वसामान्य नागरीकांचे जीवन वाढती महागाई व इंधन दरवाढीमुळे जगणे मुश्कील झाले आहे. अगोदरच कोरोनामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत सापडली आहे. यातच वाढती महागाईमुळे दिवस कसे काढावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान लातुर ग्रामीण आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाढत्या महागाई व दरवाढीच्या विरोधात येथील तहसिल कार्यालया समोर तालुका महिला कॉग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर अनोख्या पध्दतीने आंदोलन केलं. चुलीवर स्वयंपाक करून केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध केला.

महिला काँग्रेसच्या वतीनं चुलीवर स्वयंपाक करून गॅस दरवाढीचा निषेध
लातुरात अवैध बांधकामावर मनपाचा हातोडा, आयुक्त मित्तल यांची कारवाई

महागाई, भाववाढ कमी करावी अशा मागणीचे निवेदन तालुका महिला काँग्रेसच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आले. याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात दिला आहे. या आंदोलनात महिला कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुनिता आरळीकर, रेणापुर तालुका महिला कॉग्रेस अध्यक्षा पुजा इगे, रेणाच्या संचालिका वैशाली माने, माजी संचालिका इंदुबाई इगे, सिमा क्षिरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com