चंद्रपुरातील गडचांदूर मध्ये देशी दारू दुकानाला महिलांचा कडाडून विरोध!

दि. १७ ऑगस्ट २०११ चा महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार नगरपरिषद हद्दीत दुकान स्थलांतरित करताना संबंधित प्रभागातील पन्नास टक्के मतदार किंवा महिलांची सहमती आवश्यक असते. त्याशिवाय ठराव घेणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र नगरपरिषद कायद्यातील कलम ३०८ प्रमाणे जिल्हाधिकारी सदरचा ठराव स्थगित व रद्द करू शकतात असे ऍड. दीपक चटप म्हणाले.
चंद्रपुरातील गडचांदूर मध्ये देशी दारू दुकानाला महिलांचा कडाडून विरोध!
चंद्रपुरातील गडचांदूर मध्ये देशी दारू दुकानाला महिलांचा कडाडून विरोध!संजय तुमराम

चंद्रपूर : जुलै महिन्यात सीएल III देशी दारूच्या दुकान स्थलांतरणास ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी गडचांदूर नगरपरिषदेने चक्क विशेष सभा बोलावली होती. चक्क कोरोना काळात दारूच्या दुकानासाठी गडचांदूर नगरपरिषदेने कोरोना नियमांना बगल देत यासंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र ठराव मंजूर करण्यात आला होता. नगरपरिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी या ठरावाला बहुमताने मंजूर देखील केले होते व शिवसेनेच्या नगरसेवकांनी या ठरावास विरोध दर्शवला होता.

हे देखील पहा -

यासंदर्भात दारू दुकानाला विरोध करत शिवसेना नगरसेवक सागर ठाकूरवार, वैशाली गोरे, किरण अहिरकर यांनी ऍड. दीपक चटप यांच्यामार्फत ३० ऑगस्ट रोजी केस दाखल केली आहे. सदर प्रकरणाची चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे.

राज्य शासनाच्या १७ ऑगस्ट २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार देशी दारू दुकानाची अनुज्ञप्ती कोणत्याही नगरपरिषद हद्दीत स्थलांतरित करताना संबंधित प्रभागातील ५० टक्के मतदारांची अथवा महिलांची यासाठी सहमती घेणे आवश्यक असते. मात्र, यासंदर्भातील कोणतीही सहमती देशी दारू दुकानदाराने घेतली नसताना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा ठराव पारित करणे बेकायदेशीर आहे. तसेच, देशी दारू दुकानापासून काही अंतरावर महाविद्यालय व वाचनालय देखील आहे.

चंद्रपुरातील गडचांदूर मध्ये देशी दारू दुकानाला महिलांचा कडाडून विरोध!
Crime : विनयभंग करत, दारू विक्रेत्याची महिलेला भर रस्त्यात मारहाण !

त्यामुळे या परिसरात दारूचे दुकान सुरू झाल्यास मद्यपींचे प्रमाण वाढणार असून, युवक देखील नशेच्या आहारी जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही व त्यामुळे युवकांच्या आरोग्यावर त्याचे दूरगामी परिणाम होतील व महिलांवर होणारे अत्याचार देखील वाढतील. त्यामुळॆ बेकायदेशीर ठरावाच्या आधारे दुकान सुरू करण्याची परवानगी देण्यात येऊ नये असा युक्तिवाद ऍड. दीपक चटप यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर केला आहे. आता या देशी दारू दुकानाच्या विरोधात नगरवासी- सामाजिक कार्यकर्ते एकवटले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक महिलांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत दाद मागितली आहे. हे देशी दारूचे दुकान गडचांदूर शहरात स्थलांतरित होऊ नये, यासाठी स्थानिक एकत्र आले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com