उध्दव ठाकरेंसारखं काम करा; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला सल्ला

मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने नागरिकांनी मदत कोणाकडे मागावी? सर्व्हे, न करता थेट मदत द्या.
Ajit Pawar
Ajit PawarSaam TV

संजय राठोड -

यवतमाळ : पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारने ज्या प्रकारे मदत केली त्याच प्रकारे अतिवृष्टी झालेल्या भागात सरकारने ताबडतोब नागरिकांना मदत करावी अशी मागणी शिंदे सरकारकडे केली. शिवाय उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलं त्या प्रमाणे काम करण्याचा सल्ला देखील त्यांनी राज्य सरकारला दिला.

या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकाही केली. अजित पवार म्हणाले, 'दोन मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. तुम्ही तुमचं काम करा, चांगल काम केलं तर कौतुक करू शेतकऱ्यासाठी केंद्राचा निधी आणा राज्याला द्या तो तुमचं आधिकर आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पाहा व्हिडीओ -

तसंच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी त्वरित निधी दिला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने ज्या प्रकारे मदत केली त्याच प्रकारे अतिवृष्टी झालेल्या भागात सरकारने ताबडतोब नागरिकांना मदत करावी असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, स्टेटमेंट देण्यापेक्षा नागरिकांना मदत कशी करता येईल ते बघा. उध्दव ठाकरेंसारखं काम करा, मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने नागरिकांनी मदत कोणाकडे मागावी? सर्व्हे, न करता थेट मदत द्या. अधिवेशन घ्यायला तयार नाही, मंत्रिमंडळ विस्तार करायला तयार नाही. अजुनही नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे झाले नाहीत.

विरोधाला विरोध म्हणून करणार नाही, आम्ही सत्ते असताना विरोधी पक्षाने एखादी गोष्ट लक्षात आणून दिली की आम्ही त्वरित निर्णय घ्यायचो. राज्यातील नागरिक अडचणीत असताना ही वेळ चर्चा करण्याची नाही.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com