
- कैलास चाैधरी
Fire At Terkheda Fireworks Factory : धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथील फटका कारखान्यात (terkheda fireworks factory) स्फाेट होऊन कारखान्याला आग (fire) लागली. या आगीत एक कामगार जखमी झाला असून या घटनेत दहा कामगार बचावले आहेत. (Maharashtra News)
तेरखेड्याची ओळख महाराष्ट्रातील शिवकशी अशी आहे. या ठिकाणी जवळपास 150 फटका निर्मीतीचे कारखाने आहेत. त्यातीलच एका फटाका कारखान्यात कर्मचारी काम करीत असताना छाेटा स्फाेट झाला.
या स्फाेटानंतर कारखान्यास आग लागली. यावेळी घटनास्थळी 10 कर्मचारी काम करत होते. या घटनेत एकजण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अन्य कामगारांना काेणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.
ही घटना घडल्याची माहिती कळताच घटनास्थळी फायर ब्रिगेड, महसूल आणि पोलिस प्रशासन दाखल झाले. सुमारे तासभरानंतर आगीची भीषणता वाढली हाेती. वारंवार फटाक्यांचे आवज होत असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणेस अडचण येत होती.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.