Raigad: पॉस्को कंपनीविरोधात निलंबित कामगारांचे आमरण उपोषण; पुन्हा कामावर घेण्याची मागणी...

Raigad News: कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचा विश्वासघात करून सूड भावनेने 17 कामगारांना तडकाफडकी काढून टाकले, अशी कामगारांची भावना आहे.
Workers go on hunger strike against POSCO Company Demand for re-employment
Workers go on hunger strike against POSCO Company Demand for re-employmentराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: माणगांव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील पॉस्को कंपनी (Posco Maharashtra steel Pvt. Ltd.) अंतर्गत इजिटेक या कंत्राटी कंपनीच्या 17 सफाई कामगारांना कोणतेही कारण न देता कामावरून काढण्यात आले आहे. कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात कामगारांनी पॉस्को कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण (Hunger Strike) सुरु केले आहे. "आम्हाला पुन्हा कामावर घ्या" अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी कंपनीकडे केली आहे. (Workers go on hunger strike against Posco Maharashtra steel Pvt. Ltd. Demand for re-employment)

हे देखील पहा -

Workers go on hunger strike against POSCO Company Demand for re-employment
नवी मुंबई महापालिकेच्या अजब कारभाराची गजब गोष्ट!

माणगाव (Mangaon) तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रात पोस्को कंपनी स्थापन झाली आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. स्थानिक परिसरातील अनेक जण कंपनीत विविध भागात काम करीत आहेत. यापैकी सफाई विभागात काम करणाऱ्या 17 कामगारांना कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकले आहे. या कामगारांना सुविधांपासून कंपनी प्रशासनाने वंचित ठेवले आहे. याबाबत कामगारांनी व्यवस्थापनाकडे आपल्या न्याय-हक्कांसाठी बोलणी केली होती. त्यानंतर कामगारांच्या काही मागण्या मान्यही केल्या होत्या.

Workers go on hunger strike against POSCO Company Demand for re-employment
डॉक्टर हैराण! एकाच व्यक्तीला आतापर्यंत 500 पेक्षा जास्तवेळा सर्पदंश

कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचा विश्वासघात करून सूड भावनेने 17 कामगारांना तडकाफडकी काढून टाकले, अशी कामगारांची भावना आहे. व्यवस्थापनकडे याबाबत कामगारांनी विचारणा केली असता त्यांच्यावर दोषारोप पत्र देऊन कायमस्वरूपी घरी बसविले आहे. त्यामुळे या कामगारांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनीच्या या मनमानी धोरणाविरोधात कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. कंपनीने कामगारांना पूर्वरत रुजू करावे व झालेले आर्थिक नुकसान भरून द्यावे अशी मागणी उपोषणकर्त्या कामगारांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com