Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv

Aurangabad: जागतिक महिला दिनाप्रमाणे जागतिक पुरुष दिन साजरा करावा; पत्नी पिडीत पुरुष आश्रमाची मागणी

ज्याप्रमाणे मार्चला जागतिक महिला दिन साजरा होतो, त्याचप्रमाणे 19 नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन साजरा करावा.

नवनीत तापाडिया

औरंगाबाद - जागतिक महिला दिनाप्रमाणेच जागतिक पुरुष दिन देखील सर्व शासकीय कार्यालयात साजरा करण्यात यावा अशी मागणी औरंगाबाद (Aurangabad) येथील पत्नीपीडित पुरुष आश्रमाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 19 नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन असतो परंतु हे पुरुषांना देखील माहीत नाही.

Aurangabad News
Yavatmal : मोबाईलचे दुष्परिणाम टाळण्यासाठी बांशी ग्रामपंचायतीनं शोधला रामबाण उपाय

ज्याप्रमाणे मार्चला जागतिक महिला दिन साजरा होतो, त्याचप्रमाणे 19 नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन साजरा करावा. खूप वर्षांपूर्वी स्त्रिया अबला होत्या त्यांचे सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे कायदे बनवल्या गेले, त्यामुळे आता महिला सबला झाल्या आणि पुरुष अबला होत आहे.

तसेच भारत हा पुरुष प्रधान देश मानला जातो, परंतु आता महिला राजा झाल्या व पुरुषाला गुलाम बनविले, एकतर्फी कायद्यांमुळे पुरुष महिलंच्या गुलामगिरीत अडकला आहे. यासाठी आता पुरुष सबलीकरण करणे गरजेचे आहे. तसेच संविधानाने समानता दिली असल्याने स्त्री आणि पुरुषांमधील हा भेद संपवावा असही पत्नीपीडित पुरुष आश्रमाने निवेदनात म्हटलय.

8 मार्च जागतिक महिला दिन सर्व्यांच्या लक्षत असतो, त्याप्रमाणे जागतिक पुरुष दिन हा 19 नोव्हेंबरला असतो हे बहुतांश पुरुषांनाही माहित नाही.महिला दिनामध्ये पुरुषांचाही सहभाग असतो अगदी त्यांच्या सत्कारापासून तर कौतुक सोहोळ्या पर्यंत सर्व ठिकाणी प्रोतसाहन देण्यासाठी पुरुष हा सक्रिय असतो. बहुतांश कार्यालयात महिला दिन साजरा केला जातो. परंतु पुरुष दिन कुठल्याही कार्यालयात पुरुष दिन साजरा केला जात नाही. त्यामुळे जागतिक महिला दिनाप्रमाणे जागतिक पुरुष दिन साजरा करावा अशी मागणी पत्नी पिडीत पुरुष आश्रमाने केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com