विधान परिषदेवर धनगर समाजास प्रतिनिधित्व द्या : यशाेमती ठाकूरांची पटाेलेंना गळ

धनगर नेते व काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी या धनगर परिषदेचे आयोजन केले होते.
nana patole & yashomati thakur
nana patole & yashomati thakursaam tv

- अमर घटारे

अमरावती : भाजपाकडून (bjp) विधानपरिषदेवर अनेक नावांची चर्चा सुरू असतानाच अमरावतीमध्ये (amravati) नुकताच पार पडलेल्या भव्य धनगर परिषदेमध्ये धनगरांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी लक्ष द्यावे व धनगरांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी केली. त्यामुळे आता अमरावतीतून धनगर समाजाला विधान परिषदेवर प्रतिनिधित्व मिळण्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. (yashomati thakur latest marathi news)

अमरावतीत धनगर समाजाच्या वतीने धनगर परिषदेचं आयोजन करण्यात आल होते. तेव्हा मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही इच्छा व्यक्त केली. या परिषदेत धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी धनगर बांधव व नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गुजरात राज्याचे धनगर समाजाचे नेते लालजी भाई देसाई, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांच्यासह अनेक मान्यवर या परिषदेस उपस्थित होते. यावेळी निवडणूकमध्ये फक्त धनगरांचा वापर केला जातो त्यांना आश्वासन दिले जाते पण आरक्षण मिळत नाही असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

nana patole & yashomati thakur
वाझेने 'हे' सांगितले तर.., तेरा क्या होगा कालिया! साेमय्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

दुसऱ्या समाजावर अन्याय न करता धनगर समाजाला न्याय देण्यासाठी मी तुम्हांला आश्वासन देतो असे वक्तव्य नाना पाटील यांनी धनगर परिषदेमध्ये केलं. धनगर नेते व काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी या धनगर परिषदेचे आयोजन केले होते.

Edited By : Siddharth Latkar

nana patole & yashomati thakur
कांदा न खाल्ल्याने कोणी मेला आहे का? मग कशासाठी 'हा' आटापिटा : सदाभाऊ खाेत
nana patole & yashomati thakur
जमिनीचा वाद पेटला; पवना धरण प्रशासनाच्या भुमिकेकडे शिंदगाव ग्रामस्थांचे लक्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com