Yashomati Thakur News: वीज कनेक्शन कट केले तर अधिकाऱ्यांना झोडा; यशोमती ठाकूर यांचा शेतकऱ्यांना अजब सल्ला

Congress News: काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमधील शेतकऱ्यांना एक अजब सल्ला दिला आहे.
Yashomati Thakur
Yashomati Thakur Saam TV

अमर घटारे, साम टीव्ही

Amravati News : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमधील शेतकऱ्यांना एक अजब सल्ला दिला आहे. वीज कनेक्शन तोडण्यासाठी अधिकारी आले तर त्यांना तिथेच झोडा असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही, तर शेतकऱ्यांच्या विजेला हात लावू नका असा सज्जड दमही यशोमती ठाकूर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Yashomati Thakur
Maharashtra Politics : ठाकरे की शिंदे? शिवसेनेवर हक्क कुणाचा? राज्यातील सत्तासंघर्षावर आज 'सुप्रीम' सुनावणी

यशोमती ठाकूर यांनी अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा येथील पाणीटंचाइचा आढावा घेतला. यावेळी परिसरातील काही शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन कट केल्याबाबतची तक्रार त्यांच्याकडे केली. शेतकऱ्यांची तक्रार ऐकल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी भर बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं.

गेली दोन वर्ष कोरोना होता, लोकांनी काय आत्महत्या करायची का? तुम्ही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कसे काय कट करत आहात? असा सवाल त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला. शेतकऱ्यांची वीज कट करू नका, हे निर्दयी सरकार आहे, असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका देखील केली.

Yashomati Thakur
Shivsena vs BJP : 'हुकूमशहा हा तसा डरपोकच'; 'सामना'तून मोदी सरकारवर हल्लाबोल

इतकंच नाही तर, अधिकारी वीज कनेक्शन कट करण्यासाठी शेतात आले तर त्यांना तिथेच झोडा, असा अजब सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

कृषी धोरणाच्या नावाखाली महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसूली करण्याचे काम मागील ८ दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असून, महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com