बाळाच्या आईचा नणंदेने केला खात्मा; पाेलिसांनी ठाेकल्या बेडया

बाळाच्या आईचा नणंदेने केला खात्मा; पाेलिसांनी ठाेकल्या बेडया
yatvmal police arrests accusedSaam Tv

- संजय राठाेड

yatvmal police arrests accused यवतमाळ : आपल्या मुलीचा लाड हाेणार नाही या कारणास्तव त्रास देऊन विवाहितेस पेटवून दिल्याच्या घटनेप्रकरणी पाेलिसांनी पांढरकवडा तालुक्यातील दातपाडी येथील कांता संजय राठाेड हिच्यावर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करुन संशियत म्हणून अटक केली आहे. माणुसकीला काळिमा फासणा-या या घटनेची दातपाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून चर्चा हाेती. या प्रकरणाचा तपास पाेलिस उपनिरिक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे. (yatvmal-police-arrests-accused-girl-child-woman-beating-crime-news-sml80)

आशा सुनिल राठाेड यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत राठाेड यांनी माझी पुतणी माेनिका गणेश पवार हिचा सहा वर्षापुर्वी गणेश पवार यांच्यासमवेत लग्न झाले. या दाेघांना सहा वर्षाचा मुलगा आणि 12 दिवसाची मुलगी आहे. पवार यांचे एकत्र कुटुंब आहे. माेनिकाची माेठी नणंद कांता संजय राठाेड या देखील तेथेच राहतात. या दाेघींत सातत्याने वाद हाेत हाेते याबाबत माेनिका मला नेहमी सांगत हाेती. परंतु तिचे घरी अन्य लाेक (पती, सासु, सासरे, जावू) हे चांगले राहत असून तिचे नणंद विरुद्ध तक्रार दिली नाही.

आठ जूलैला सायंकाळी पाच वाजता माझी नणंद माया गाेपाल पवार यांनी माेनिकाच्या घरच्यांचा फाेन आला आणि माेनिका दुपारी दाेन वाजता घरी जळली असून तिला उपचारासाठी सेवाग्राम येथे दाखल केले आहे. दुस-या दिवशी आम्ही सेवाग्राम रुग्णालयात गेलाे. त्यावेळी तिच्या सासरची मंडळी उपस्थित हाेते.

माेनिकाला भेटल्यानंतर तिने अश्रु ढाळतच घडलेली घटना सांगितली. मला मूलगी झाल्याने माझी नणंदेच्या मुलीचे लाड हाेणार नाहीत या कारणाने ती माझ्यावर चीडून हाेती. त्यातूनच तिने माझ्यावर अंगावर आॅईल टाकून मला पेटवून दिले. त्यानंतर काय घडले मला काहीच माहिती नाही असे सांगितले. तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही तक्रार केली नव्हती.

yatvmal police arrests accused
सातारा : 29 बाधितांचा मृत्यू; महाबळेश्वरात एक रुग्ण आढळला

दरम्यान आज (रविवार, ता. 18) माेनिका हिचा मृत्यू झाल्याचे आम्हांला समजले. त्यामुळे तिच्यावर अन्याय करणा-यांविराेधात तिची नणंद कांता संजय राठाेड हिच्या विराेधात तक्रार केल्याचे सांगितले. दरम्यान कांता राठाेड हिला संशियत म्हणून पाेलिसांनी अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com