यवतमाळ: पावसामुळे भिंत कोसळून 19 बकऱ्या ठार!

वणी तालुक्यातील वाजरी येथील शेळी पालन करणाऱ्या संतोष करडे यांच्या जुन्या घराची भीत कोसळून 19 बकऱ्या ठार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री दरम्यान घडली आहे.
यवतमाळ: पावसामुळे भिंत कोसळून 19 बकऱ्या ठार!
यवतमाळ: पावसामुळे भिंत कोसळून 19 बकऱ्या ठार!Saam Tv

संजय राठोड

यवतमाळ: वणी Wani तालुक्यातील वाजरी येथील शेळी पालन करणाऱ्या संतोष करडे यांच्या जुन्या घराची भीत कोसळून 19 बकऱ्या ठार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री दरम्यान घडली आहे. यामुळे दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हे देखील पहा-

वणी परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाने Heavy Rain दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेत पिकासोबत इतर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वांजरी येथील संतोष करडे हा शेळी पालनाचा व्यवसाय करतात. त्यांनी नुकतेच गावात नवीन घर बांधले आहे. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी तो जुन्या घरातील खोलीत बकऱ्या सोडल्या होत्या.

यवतमाळ: पावसामुळे भिंत कोसळून 19 बकऱ्या ठार!
Kalyan: मोनालिसा बारवर पोलिसांचा छापा; 56 जण ताब्यात!

मध्यरात्रीला घराची भिंत कोसळल्याने 19 बकऱ्या जागीच ठार झाल्या तर काही बकऱ्या जखमी झाल्या आहे या मध्ये संतोष करडे यांचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com