
संजय राठोड, साम टीव्ही
Yavatmal Accident News: यवतमाळ जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये एसटी बस आणि भरधाव बोलेरो पिकअपची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पिकअप वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (१६ मे) दुपारी दोन वाजेच्या सुमारास कासोळा गावानजीक पिंपळगाव सुतगिरणी परिसरातील वळणावर घडली. (Breaking Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाची बीड-किनवट ही बस पुसदकडून येत होती. त्याचवेळी भरधाव वेगात येणारे पिकअप वाहन माहूरकडून येत होते. या दोन वाहनांमध्ये कासोळा नजीकच्या वळणावर समोरासमोर भीषण (Accident) अपघात झाला. या अपघातामध्ये पिकअप वाहनचालक जागेवरच ठार झाला आहे.
मृताची ओखळ अद्यापही पटली नाही. त्याच्याजवळ ओळखीचा कोणताही पुरावा मिळून आलेला नाही. मात्र तो मालेगावचा रहिवासी असल्याचे समजते. त्याला पुसद (Yavatmal) उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान या अपघातात पिकअप वाहनाचा चक्काचूर झालेला आहे. तर बसचेही नुकसान झाले आहे. बसचा चालक व काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. (Latest Marathi News)
पुसद-माहूर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र वनविभागाच्या हद्दीत रुंदीकरणाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे तेथे पूर्वीप्रमाणे अरुंद रस्ता आहे. येथील वळण रस्ता अतिशय छोटा असून बाजूला झाडी असल्यामुळे वाहन चालकांना समोरून येणारे वाहन जवळ आल्याशिवाय दिसत नाही. अशातच बोलेरो गाडीचा टायर फुटल्याची माहिती मिळाली. यामधूनच हा अपघात झाला असावा, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.